Share

‘आम्हाला मारण्याची धमकी मिळते’; क्रांती रेडकरचा खुलासा

Published On: 

मुंबई : नवाब मलिक आणि समीर वानखेडे वाद आता चांगलाच पेटला असल्याचे चित्र दिसत आहे. यावरून राजकीय वातावरणात देखील खळबळ उडाली आहे. आज नवाब मलिक यांनी एक पत्र सादर करत समीर वानखेडे यांच्या अनेक गंभीर आरोप केले. यावरून आता समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकरने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

याबाबत क्रांती रेडकरने माध्यमांसमोर सांगितले की, समीर या प्रकरणातून बाहेर पडतील. नेहमी सत्याचा विजय होतो. तेव्हा मला त्याची काहीही काळजी वाटत नाही. समीर हे निर्दोष आहे. मला या प्रकरणाचा खूप त्रास झाला. मला माझ्याच महाराष्ट्रामध्ये येवून धमकावतो, यावेळी मला काहींनी सुरक्षा दिली आहे. आम्हाला ट्रोलिंग केले जात आहे. आम्हाला मारण्याची धमकी मिळते आहे. अनेकांना समीर वानखेडे नको आहेत. त्याचे कारणही सगळ्यांना माहिती आहे,’ असेही ती म्हणाली.

पुढे ती म्हणाली, ‘समीर फक्त कलाकारांनाच पकडत नाही. त्यामुळे त्यांच्यावर जो आरोप केला जातोय तो ही चूकीचा आहे. आम्ही सर्व तयारी केली आहे. या प्रकरणाला सामोरं जाण्याची, आमच्याकडे देखील सगळे पुरावे आहेत. वेळ आल्यावर आम्ही ते सगळ्यांसमोर सादर करु. तेव्हा कळेलच हे सारं कुणी केलं आहे, असे देखील तिने स्पष्ट सांगितले.

तर नवाब मलिक यांनी पत्राद्वारे केलेल्या आरोपावर क्रांती रेडकर म्हणाल्या की, ‘त्या पत्रांना काहीही अधिकार नाही. हे लक्षात घेण्याची गरज आहे. त्या पुराव्यांना काहीही अर्थ नाही. अशी पत्रं कोणीही लिहू शकतो, त्या माणसानं समोर यावं. हे आरोपही खोटे आहेत. समीर हे निर्दोष आहे. हे प्रकरण कोर्टात जाऊ गेल्यानंतर खरे खोटे समोर येईल,’ सध्या या प्रकारणाबाबत नवनवीन माहिती समोर येत असल्याने सर्वत्र एकच चर्चा होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!