🕒 1 min read
मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनी धक्कादायक खुलासे केल्यानंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची खात्यांअंतर्गत चौकशी होणार आहे. दरम्यान काही वेळापूर्वीच नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये पत्र सादर करत अनेक समीर वानखेडे यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहे. यावरून आता समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी प्रतिक्रिया देत मलिकांनी केलेले आरोप खोटे असल्याचे म्हंटले आहे.
क्रांती रेडकर पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, ‘त्या पत्रांना काहीही अधिकार नाही. हे लक्षात घेण्याची गरज आहे. त्या पुराव्यांना काहीही अर्थ नाही. अशी पत्रं कोणीही लिहू शकतो, त्या माणसानं समोर यावं. हे आरोपही खोटे आहेत. समीर हे निर्दोष आहे. हे प्रकरण कोर्टात जाऊ गेल्यानंतर खरे खोटे समोर येईल.
नवाब मलिक ट्विट करत या घटनेची माहिती देत आहे, यावरून क्रांती म्हणाली, ‘नुसती ट्विटर बाजी सुरु आहे. मी पण काहीही लिहू शकते. ट्विटर हे कोर्ट आहे का? आरोप सिद्ध झाले तर बोला ना, ज्या माणसाचे 15 वर्ष रेकॉर्ड क्लिन आहे. त्याच्यावर अशाप्रकारचे आरोप करणे चुकीचे आहे. कुटुंबाला धमक्याचे देखील फोन येतात. समीर या प्रकरणातून बाहेर पडतील. नेहमी सत्याचा विजय होतो. मला त्याची काहीही काळजी वाटत नाही,’ असे देखील क्रांती म्हणाली.
महत्वाच्या बातम्या
- ‘सोशल मीडियावर खेळ खेळत बसण्यापेक्षा पुरावे द्या’; क्रांतीचे मलिकांना प्रत्युत्तर
- ‘गृहमंत्री काश्मीरमध्ये असताना पाकिस्तानचा विजय आणि भारताचा पराभव साजरा’ संजय राऊतांचे टीकास्त्र
- नवाब मलिक लवकरच रिलीज करणार ‘स्पेशल २६’
- समीर वानखेडेंचे जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी देणार- नवाब मलिक
- जिल्ह्यात पोलीस अधिकाऱ्यांना कलम 36 अन्वये अधिकार प्रदा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
