Share

आम्ही राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांना वर्चस्व गाजवण्याची संधी दिली : रिषभ पंत

Published On: 

मुंबई : आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या अंत्यत चुरशीच्या सामन्यात आखेर राजस्थान रॉयल्सने बाजी मारत दिल्ली कॅपीटल संघाचा ३ गडी राखुन पराभव केला. दिल्लीने कर्णधार पंतच्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थानसमोर १४८ धावांचे लक्ष्य ठेवले. दोन चेंडु बाकी असताना ७ गडी गमावुन राजस्थानने विजय साकारत गुणतालीकेत आपले खाते उघडले.

नाणेफेक जिंकल्यानंतर राजस्थानने दिल्लीच्या संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. मागील सामन्यात शतकी सलामी देणारी धवन-शॉ ही जोडी या सामन्यात अपयशी ठरली. जयदेव उडानकटने दोघांनाही बाद करुन राजस्थानला चांगली सुरुवात करुन दिली. यानंतर ठरावीक अतंराने दिल्लीचे गडी बाद होत गेले. या दरम्यान कर्णधार रिषभ पंतने एकाकी झुंज देत ३२ चेंडुत ९ चौकाराच्या मदतीने ५१ धावांची अर्धशतकी खेळी साकारली. या खेळीच्या जोरावर दिल्लीच्या संघाने राजस्थानसमोर १४८ धावांचे लक्ष्य ठेवले.

धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या राजस्थान संघाची यावेळीही सुरुवात चांगली झाली नाही. तसेच मागील सामन्यातील हिरो कर्णधार संजु सॅमसन लवकर माघारी परतला. त्यानंतर मात्र मधल्या फळीतील डेव्हीड मिलरने ४३ चेंडुत ७ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ६२ धावांची खेळी करत विजय आवाक्यात आणला. तो बाद झाल्यानंतर अष्टपैलु खेळाडू ख्रिस मॉरीसने १८ चेंडुत ३६ धावांची वादळी खेळी करत राजस्थानच्या संघाला विजयी केले.

पंत सामन्यानंतर म्हणाला, ‘माझ्या मते गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली होती, पण शेवटी आम्ही त्यांना (रॉयल्स फलंदाजांना) वर्चस्व गाजवण्याची संधी दिली. आम्ही चांगलीगोलंदाजी करू शकलो असतो.’

पुढे पंत म्हणाला, ओस मुळे त्याच्या गोलंदाजांना त्रास सहन करावा लागला, ‘दव खूप होता. मला वाटते की आम्ही 15 ते 20 धावा कमी केल्या. परंतु या सामन्यासाठी काही सकारात्मक बाजू होती, गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली. आम्हाला आशा आहे की भविष्यात आम्ही विजय मिळवू.  माझ्या मते पहिल्या डावापेक्षा दुसऱ्या डावात जास्त दव पडले होते आणि त्यामुळे आम्हाला काहीतरी वेगळे करावे लागले कारण हळू चेंडू थांबला नव्हता.’

महत्त्वाच्या बातम्या     

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!