मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. सध्या संभाजीराजे हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून विविध भागांमध्ये समाज बांधवांच्या भेटी व बैठक घेऊन त्यांच्या भावना समजावून घेत आहेत.भाजपचे खासदार संभाजी छत्रपती यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संभाजी छत्रपती यांनी अत्यंत संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.
यावेळी पत्रकार परिषदेत संभाजीराजे म्हणाले कि, ‘ मी सकल मराठा समाजाच्या वतीने मी बोलत आहे. कोणत्या पक्षाच्या वतीने किंवा राजकीय भूमिका घेऊन बोलत नाही. मी महाराजांचा वंशज आहे. 1917 ला शाहू महाराज म्हणाले की मी मराठ्यांचं नेतृत्व करत नाही तर मी शिपाई म्हणून नेतृत्व करायला आलो आहे. आता आपण सामाजिक मागास राहिलेलो नाही. ऑगस्ट 2017 मध्ये मी आझाद मैदानात स्टेजवर गेलो आणि भूमिका घेतली कारण त्या ठिकाणी जातीय तेढ निर्माण होणार होती. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला तो सर्वोच्च होता. मी त्यावेळी भूमिका घेतली माझ्यावर टीका झाली. आम्हाला भांडण करण्यात घेणंदेणं नाही आम्हाला न्याय पाहिजे. समाजाला वेठीस धरू नका,’ असा सज्जड इशारा त्यांनी दिला आहे.
तसेच, ‘9 सप्टेंबर 2020 च्या आधी झालेल्या नियुक्त्या करून टाका अस सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. राज्याच्या हातात ते आहे मग करून टाका. कशाला ठेवता, लोकं अक्षरशः रडत आहेत, असं ते म्हणाले. सारथीच्या समितीमध्ये समाजाची माणसं घ्या. आयएएस अधिकारीच का? सारथीला किमान एक हजार कोटी रुपये द्या. अण्णासाहेब पाटील महामंडळ पुनर्उभारणी झाली पाहिजे. हे तुमच्या हातात आहे ते तर द्या. 30 टक्के श्रीमंत आहे त्यांना सोडून द्या पण 70 टक्के गरीब आहे त्यांना तर सवलती दिल्या पाहिजे,’ असे देखील ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘छत्रपती घराण्याचा वंशज हात जोडून विनंती करतोय, या समाजाला बाहेर फेकू नका’
- दिलासा…औरंगाबादेत पॉझिटिव्हीटी रेट २.२७ टक्क्यांपर्यंत खाली, तर रिकव्हरी रेट ९६.४० टक्क्यांवर!
- पुण्यातील लॉकडाऊनमध्ये मोठा बदल, राजेश टोपेंनी केली घोषणा
- अखेर स्मार्ट सिटी बसला मिळाला मोबदला, १ कोटी ७० लाख आले, ८ लाख बाकी!
- मुख्यमंत्र्यांना ६ जून पर्यंतचा अल्टिमेटम; ‘या’ पाच गोष्टी मान्य न केल्यास शिवराज्याभिषेक दिनापासून आंदोलन !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
