Share

सवलती नको आरक्षण मिळालं पाहिजे; धनगर समाज महासंघाची मागणी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने धनगर समाजाला चुचकारण्याचे काम सुरु केले आहे. राज्य सरकारने अनुसूचित जमातींमधील सर्व सवलती आता धनगर समाजाला लागू केल्या आहेत. महाराष्ट्रात अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांना २२ योजना दिल्या जातात, त्या आता धनगर समाजातील नागरिकांनाही लागू होणार आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धनगर समजाची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असल्याच बोललं जात आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार आहे. हा निर्णय घेताना राज्य सरकारने धनगर समाजाला थेट आरक्षण जाहीर न करता, अनुसूचित जमातीमध्ये मिळणाऱ्या सुविधा देऊ केल्या आहेत.

मात्र सरकारच्या निर्णयांवर आता टीका होऊ लागली आहे. धनगर समाजाला केवळ सवलती देण्यापेक्षा राज्यघटनेच्या आधारे मंजूर असलेलं आरक्षण मिळालं पाहिजे, त्यासाठी या समाजातल्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे, असं धनगर समाज महासंघ नेते आणि माजी आमदार अण्णासाहेब डांगे यांनी म्हटलं आहे. सांगली इथं प्रसारमाध्यमांशी काल ते बोलत होते.

तसेच पुढे बोलताना धनगर समाज ओबीसी प्रवर्गात समाविष्ट असल्याने या समाजालाही अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळालं पाहिजे, अशी मागणीही अण्णासाहेब डांगे यांनी केली.

महत्वाच्या बातम्या 

भारतीय सैन्याला मोठं यश, POK मध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ केले नष्ट

‘कार्यकर्त्यांनो पवार साहेबांची साथ सोडू नका’ आठवलेंची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना साद

देवाच्या साक्षीने सांगतो, धनगर समाजाला आरक्षण देणारचं – जानकर

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!