Share

देवाच्या साक्षीने सांगतो, धनगर समाजाला आरक्षण देणारचं – जानकर

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : देवाच्या साक्षीने सांगतो, धनगर समाजाला आरक्षण देणारचं असा विश्वास पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी धनगर समाजाला दिला आहे. ते शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 2 च्या इमारतीचे तसेच शिरसगाव काटा येथील स्थलांतरित दवाखान्याचा उदघाटन समारंभ प्रसंगी बोलत होते.

दरम्यान, धनगर आरक्षणाचा प्रश्न हा कोणत्याही जातीतील म्हणजेच एसटी जातीतील समाज बांधवांच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता धनगर समाज बांधवांना एसटी आरक्षणाच्या सवलती मिळणार आहे, असे प्रतिपादन महादेव जानकर यांनी केले. मराठा आरक्षण हे कोणत्याही जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता कोर्टाच्या निर्णयानुसार पार पडले. कारण यापूर्वीच्या सरकारने भक्कम असे आरक्षण कोर्टामध्ये न मांडल्यामुळे ते आरक्षण कोर्टामध्ये टिकले नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.

तर, कायद्याच्या कचाट्यातमध्ये धनगर आरक्षण रखडले आहे. चुकीचा अहवाल दिल्यामुळे हे आरक्षण मिळाले नाही. धनगर आरक्षण मिळण्यासाठी कमिशन नेमलेले असून अहवाल येणे बाकी आहे. धनगर समाज बांधवांना आरक्षण देण्यास हे शासन कटिबद्ध आहे. असं देखील महादेव जानकर म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!