टीम महाराष्ट्र देशा : काश्मीरमध्ये भारतीय जवानांना मोठ यश आले आहे. भारतीय जवानांनी दहशतवाद्यांची तळे उध्वस्त करत ७ दहशतवाद्यांना ठार केले आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुमारे ३० किलोमीटर आत घुसून लष्कराने दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.
भारतीय सैन्याने ही कारवाई केल्यामुळे पाकिस्तानच्या नीलम झेलम जलविद्युत प्रकल्पाचंही नुकसान झालं. या प्रकल्पातून ४०० ते ५०० मेगावॅट वीजनिर्मिती होते. त्यामुळे पाकिस्तानच्या वीजनिर्मितीवर परिणाम झाला आहे. यामुळे पाकिस्तानचे जनजीवन विस्कळीत होऊ शकते.
Use of cluster bombs by Indian Army violating international conventions is condemnable. No weapon can suppress determination of Kashmiris to get their right of self determination. Kashmir runs in blood of every Pakistani. Indigenous freedom struggle of Kashmiris shall succeed,IA.
— DG ISPR (@OfficialDGISPR) August 3, 2019
पाकिस्तानकडून या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया आली आहे. भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये क्लस्टर बॉम्बचा उपयोग केल्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या नियमांचं उल्लंघन झालं आहे. तसेच प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाच्या रक्तात काश्मीर आहे काश्मीरमधल्या लोकांची स्वातंत्र्याची लढाई यशस्वी होईल असही पाकिस्तानकडून सांगण्यात आलं आहे. यासंबंधीचे वृत्त न्यूज 18 लोकमतने दिले आहे.
दरम्यान, यापूर्वीही भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बालाकोटमध्ये हवाई हल्ला करून २०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा करत काश्मीरमध्ये जवानांवर झालेल्या हल्ल्याचा बदला घेतला होता.
अमेरिकेचा पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर ड्रोन हल्ला
जवानांचे प्राण गेल्यावर सरकारला आली जाग; जम्मू-काश्मीरमधील शस्रसंधी संपुष्टात
BSF ने केला पाकिस्तानचा हिशोब चुकता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

