Share

‘उस्मानाबादला आम्ही धाराशिवच म्हणतो’, शिवसेना मंत्र्याचे नामांतरावर भाष्य

Published On: 

उस्मानाबाद : आम्ही सुरुवातीपासून धाराशिवच म्हणतो. हे धाराशिवच असून, नंतर त्याचे उस्मानाबाद नामांतर झाले, असे सांगत शासकीय पातळीवर उस्मानाबादच्या धाराशिव नामांतरणासाठी सुरू असलेल्या प्रक्रियेवर राज्याचे नगरविकासमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी थेट भाष्य करणे टाळले. ते उस्मानाबाद येथे आले असता पत्रकार परिषदेत बोलत हाेते.

पत्रकारांनी राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे, नवाब मलिक यांचे जावई आदींच्या प्रकरणावरून विचारले असता, मी येथे प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आलो असून, राजकीय भाष्य करणार नाही, असे म्हणत त्यांनी हा विषय टाळला. महाविकास आघाडी मजबूत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वकाही सुरळीत चालले आहे. राज्याच्या विकासाच्या अनुषंगाने महाविकास आघाडी सरकार काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी राज्य शासनाने निर्णय घेतलेल्या युनिफाइड डीसीपीआर योजनेंतर्गत आता राज्यात एकाच नियमावलीअंतर्गत नगरविकासाची कामे होतील, असे स्पष्ट केले. यामुळे शहरनिहाय बदलणाऱ्या नियमांना तसेच एसएफआयमधील गैरप्रकारांना आळा बसेल. या नवीन नियमांमुळे १५०० स्केअर फुटांपर्यंतच्या बांधकामाला परवानगीची आवश्यकता नसेल असेही स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!