मुंबई : देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या पाच जणांच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा क्रमांक आला आहे. ‘इंडिया टुडे’च्या ‘मूड ऑफ द नेशन’ या सर्व्हेत देशातील सर्वाधिक लोकप्रिय ११ मुख्यमंत्र्यांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या ११ मुख्यमंत्र्यांमध्ये फक्त भाजपच्या दोन मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे.
यावरून महाविकास आघाडी आणि शिवसेनेतील नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भरभरून कौतुक करत असले तरी भाजपने मात्र त्यांची खिल्ली उडवली आहे. यावर शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाष्य करत विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय. ‘काम केलं असल्यानेच उद्धव ठाकरे यांचा टॉप-५ मुख्यमंत्र्यांमध्ये समावेश झाला आहे,’ असं पेडणेकर यांनी म्हटलंय.
‘मुख्यमंत्री टॉप फाईव्हमध्ये आले. ही विरोधकांना जबरदस्त चपराक बसली आहे. काम केलं म्हणून ते टॉप 5 मध्ये आले. विरोधकांचं मीठ आळणीच राहिलं आहे, अशी टीकाही पेडणेकरांनी केली. मातोश्रीने करून दाखवलं. त्यामुळे ‘मातोश्री’ टार्गेट राहणारच, पण विरोधकांनी ‘मातोश्री’कडे लक्ष न देता, लसीकरणाकडे द्यावे. तसंही आम्हाला कुणी टार्गेट केलं तरी काही फरक पडत नाही,’ असा टोला देखील किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तुम्ही कितीही ताकद लावा शेतकरी येणार अन् बैलगाडा शर्यत होणारच’
- भारतातील मुस्लिम लॉ बोर्डाकडून तालिबानचे कौतुक
- ‘मंदिरे खुली करण्यासाठी आंदोलने करण्यापेक्षा दिल्लीतून लस आणण्यासाठी भाजपने प्रयत्न करावेत’
- ‘या’ कारणामुळे अनिल देशमुख ईडीसमोर गैरहजर, वकिलांचे स्पष्टीकरण
- ‘कोमार्य चाचणी विषय राष्ट्रीय पातळीच्या अभ्यासक्रमातून वगळावा’, अंनिसचे मंत्री भारती पवारांना निवेदन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

