🕒 1 min read
सांगली : बैलगाडा शर्यतीवरुन राजकीय वाद पेटल्याचा पाहायला मिळतंय. विविध संघटना आणि पक्ष हे बैलगाडा शर्यतीसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होऊ लागले आहेत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. यामुळे पोलीस आणि पडळकर यांच्यात संघर्ष निर्माण होण्यास सुरुवात झाली असून जेलमध्ये टाकलं तरी शर्यत होणारच असा निर्धार पडळकरांनी केला आहे. 20 ऑगस्ट रोजी पडळकर यांनी झरे गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं आहे.
आता माजी राज्यमंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी देखील राष्ट्रवादी काँगेससह महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘शेतकरी आपले बैल आणून न्याय मागणार असतील आणि हे तालिबानी वृत्तीने वागत असतील तर शेतकरी शांत बसणार नाही, तो आंदोलन करेल,’ असा इशारा खोत यांनी दिला आहे.
‘झरे गावाला पोलीस छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. असं असलं तरी 20 ऑगस्टला सरकारनं कितीही ताकद लावली तरी शेतकरी येतील. जे काही अनुचित होईल त्याची जबाबदारी सरकारची असेल. आम्ही शेतकऱ्यांना बरोबर घेऊन मैदानात उतरु, संघर्ष करु,’ असं देखील सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.
पुढे त्यांनी खिलारी बैलांबाबत चिंता व्यक्त केली आहे. ‘बैलगाडा शर्यतीची परंपरा 400 वर्षे जुनी आहे. याबाबत 2014 मध्ये सुप्रीम कोर्टानं बंदी आणली. त्यांनी सांगितलं की राज्यांनी कायदा करावा. राज्य सरकारने 2017 ला याला परवानगी देण्याचा कायदा झाला. त्याचा अहवाल आला. कर्नाटक, तामिळनाडू सरकारने कायदा करुन शर्यती सुरु केल्या. महाविकास आघाडी सरकारकडून न्यायालयात बाजू मांडली गेली नाही. महाराष्ट्रात देशी गायींचं संगोपन धोक्यात आलं आहे. खिलारी जात ही धावण्यासाठी असते. शर्यत बंद राहिली तर बैलांची ही जात नामशेष होईल,’ अशी चिंता सबभाऊ खोत यांनी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राज कुंद्राला कोर्टाकडून दिलासा; अटकपूर्व जामीन अर्जावर ‘या’ दिवशी होणार सुनावणी
- भारतातील मुस्लिम लॉ बोर्डाकडून तालिबानचे कौतुक
- ‘मंदिरे खुली करण्यासाठी आंदोलने करण्यापेक्षा दिल्लीतून लस आणण्यासाठी भाजपने प्रयत्न करावेत’
- ‘या’ कारणामुळे अनिल देशमुख ईडीसमोर गैरहजर, वकिलांचे स्पष्टीकरण
- ‘कोमार्य चाचणी विषय राष्ट्रीय पातळीच्या अभ्यासक्रमातून वगळावा’, अंनिसचे मंत्री भारती पवारांना निवेदन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
