मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधत असतांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली आहे.
संदर्भात बोलत असतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले की,’मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय जनता दल आणि मुस्लिम लीग सोबत आघाडी करणार आहे.’ तसेच तीन पक्ष मिळून जानेवारीच्या मध्यापर्यंत जागावाटप जाहीर करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. याबरोबरच अजून काही पक्ष देखील आमच्यासोबत येत असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’आम्ही एमआयएम सोबत महापालिका निवडणुकीत जाणार नाही. आम्ही शिवसेनेसोबत युती करायला तयार आहोत परंतु ते आमच्या सोबत येतील का हा प्रश्न आहे. आम्ही सेक्युलर पार्टीसोबत युती करायला तयार आहोत’, असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…ही संकटाची चाहूल तर नाही ना , याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावेच लागेल’
- भाजप कार्यकर्त्यांविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून; राऊतांविरोधात दिल्लीत तक्रार दाखल
- सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपाला सांगितला राऊतांनी उच्चारलेल्या ‘त्या’ शब्दाचा अर्थ
- ‘मलिकांचे गुडगोईंग म्हणून कौतुक करणारे मुख्यमंत्री आव्हाड आणि टोपेंबाबत पक्षपात करत आहेत का?’
- दिल्लीत तक्रार दाखल झाल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले,’मी जो शब्द वापरला आहे त्याचा अर्थ…’

