Share

आम्ही पुढील दहा वर्षेही आंदोलन करण्यास तयार आहोत- राकेश टिकैत

Published On: 

नवी दिल्ली : शेतकरीविरोधी तीन काळे कृषी कायदे व वीज क्षेत्राचे खासगीकरण विधेयक रद्द करावे. इंधनाचे दर कमी करून त्या जीएसटीच्या कक्षेत आणावे. स्वामीनाथन समितीच्या शिफारसीनुसार सर्व शेतीमालाला आधारभूत किमती व सरकारी खरेदीची हमी देणारा कायदा करावा, यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी आज संयुक्त किसान कामगार मोर्चाच्या वतीने भारत बंदची घोषणा केली आहे.

भारत बंदला अनेक शेतकरी संघटना,कामगार संघटना, राजकीय पक्ष, राज्य सरकार आणि संघटनांनी पाठिंबा दिला आहे. राज्य सरकारांमध्ये तामिळनाडू, छत्तीसगड, केरळ, पंजाब, झारखंड आणि आंध्रप्रदेश सरकारांनी भारत बंदला पाठींबा दिला आहे. तर, राजकीय पक्षांमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक, क्रांतिकारी समाजवादी पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, आम आदमी पक्ष , समाजवादी पार्टी, तेलुगु देसम पार्टी, जनता दल, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, द्रविड मुन्नेत्र कळघम, झारखंड मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय जनता दल, स्वराज इंडिया, शिवसेना आणि इतर अनेक पक्षांनी भारत बंदला पूर्ण पाठिंबा दिला आहे.

या बंदमध्ये शेतकऱ्यांची अनेक महामार्ग जाम केले आहेत, तसेच रेल रोकोही करण्यात येतोय. दरम्यान, ‘आम्ही पुढील दहा वर्षेही आंदोलन करण्यास तयार आहोत’ अशी प्रतिक्रियी भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी दिली आहे. केंद्रीय कृषी मंत्री चर्चेसाठी येण्याचे आमंत्रण देत आहेत त्यांनी आम्हाला वेळ आणि ठिकाण सांगावं. पण, केंद्र सरकार तसं करणार नाही. ते फक्त बोलतात पण करत काहीच नाहीत. सरकारने आम्हाला बिनशर्त चर्चेसाठी बोलवावे 10 वर्षे लागली तरी आम्ही तयार आहोत पण आम्ही आमच्या मागण्या मागे घेणार नाही. तसेच, बंद दरम्यान रुग्णवाहिका, डॉक्टर आणि आपत्कालीन सेवांशी संबंधित इतर लोकांना थांबवले जाणार नाही असेही टिकैत यांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!