Share

मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही पण ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये- समीर भुजबळ

Published On: 

पुणे- राज्यातील विविध ठिकाणी ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यात आम्ही आंदोलनाची तयारी केली होती. मात्र पोलिसानी आम्हाला मोर्चा काढू दिला नाही. आमची आज ही तीच भूमिका आहे की, मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजाला आरक्षण दिले जावे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते समीर भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा पूर्णपणे पाठींबा आहे. मात्र मराठा समाजाला आरक्षण देतांना ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्यात येऊ नये. त्यामुळे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राज्य सरकारने उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकील नियुक्त करणे यासह विविध मागण्यासाठी आज शनिवारवाडा ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.

पुण्यात ओबीसी आरक्षणच्या मागणीसाठी महात्मा फुले समता परिषदेसह विविध संघटनानी शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र त्यांच्या मोर्चाला पोलीस विभागामार्फत परवानगी देण्यात आली नव्हती. तरी मोर्चा काढल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते समीर भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ‘उठ ओबीसी जागा हो, आरक्षणाचा धागा हो’, ‘जय ज्योती जय संविधान’ यासह विविध मागण्यांचे फलक हाती घेऊन कार्यकर्ते मोर्चामधी सहभागी झाले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!