औरंगाबाद : सिल्लोड-सोयगाव मतदार संघासह जिल्हा पोलिस दलाला सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असून सोयगाव, फर्दापूर , अजिंठा याठिकाणी पोलीस ठाण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची प्रशासकीय कारवाई पूर्ण करून येथे सुसज्ज नवीन पोलीस स्टेशन इमारतीसाठी प्रस्ताव सादर करा यासाठी निधी कमी पडू देणार नाही. अशी ग्वाही महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोमवारी (दि.९) दिली.
सिल्लोड येथे पोलीस स्टेशन आवारात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या स्थानिक निधीतून पोलीस बांधवांसाठी प्रतीक्षा कक्ष तसेच सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या सुसज्ज शौचालयाचे बांधकाम भूमिपूजन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. या भूमिपूजन प्रसंगी मार्गदर्शन करीत असतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक केएमएम प्रसन्ना यांची प्रमुख उपस्थिती होती.
सिल्लोड येथे बंदोबस्तासाठी बाहेरून येणाऱ्या पोलीस बांधवांना राहण्यासाठी जागा नव्हती नगर परिषदेच्या माध्यमातून त्यांना सामाजिक सभागृह दिले जात होते. यानंतर आता पोलीस स्टेशन आवारातच ही व्यवस्था होणार आहे असे स्पष्ट करीत प्रशासकीय विभागात सर्व सुविधा देऊन स्वच्छतेच्या अनुषंगाने नवीन बदल आणावा यासाठी सिल्लोड पोलीस स्टेशन च्या आवारात सुसज्ज असे सौचालय उभारण्यात येत आहे.
हा उपक्रम जिल्हाभर राबविणार असून सोयगाव आणि सिल्लोड तहसीलदार यांनी शौचालया संबंधी प्रस्ताव सादर करावा त्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून तहसील कार्यालयाच्या परिसरातही अशाच प्रकारचे शौचालय उभारू असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. आपण विकासाच्या बाबतीत जिल्ह्यात पुढे असलो तरी कोरोना लसीकरणात सर्वाधिक मागे असल्याची खंत व्यक्त करीत कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाने लसीकरण करून घ्यावे यासाठी प्रशासकीय यंत्रणेने विशेष अभियान राबवून याबाबत जनजागृती करावी असे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी केले.
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधानांच्या हस्ते पीएम-किसान योजनेचा नववा हप्ता जाहीर; 9.75 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ
- ‘खायचं कोणाचं आणि गायचं कोणाचं? हे वागणं कौतुकास्पद पण…’; चित्रा वाघ यांचा खोचक टोला
- ‘आरक्षण पूर्ववत करण्यासाठी केंद्राने उपयुक्त असणारा इम्पेरिकल डेटा द्यावा’ ; भुजबळांची मागणी
- धक्कादायक : औरंगाबादेतही कोरोना लसींचा काळाबाजार उघड, पोलिसांची कारवाई
- औरंगाबाद जिल्ह्यात पाच लाख शेतकऱ्यांनी काढला पिक विमा!


