Share

पुणेकरांनो काळजी घेण्याची हीच ती वेळ ; वाचा शहरातील कोरोना स्थिती

Published On: 

पुणे : महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढत होती. परंतु, हळूहळू ही रुग्णसंख्या आता आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान आज पुणे शहरात आज नव्याने १५७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ७७ हजार ७४१ इतकी झाली आहे.

शहरातील २८० कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ६६ हजार ८७४ झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात ४ हजार १७६ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २६ लाख ५५ हजार ८९६ इतकी झाली आहे.

पुणे शहरात उपचार घेणाऱ्या २ हजार २८९ रुग्णांपैकी २९१ रुग्ण गंभीर तर ४२८ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ५७८ इतकी झाली आहे. दरम्यान सध्या दर आठवड्याला जिल्ह्याचा आढावा घेऊन संबंधित जिल्ह्याचे स्तर प्रशासनातर्फे ठरवण्यात येत आहेत. पण आता डेल्टा प्लस व्हायरस डोकं वर काढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!