🕒 1 min read
उस्मानाबाद: तेरणा मध्यम प्रकल्पातील बंद पाईपलाईन बाबत चौकशीचे आदेश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत. त्यासाठी एक समिति गठित करण्यात आली असून अहवाल अद्याप आलेला नाहीये. या चौकशीतून पथदर्शी योजनेमध्ये झालेली अनियमितता लवकरच बाहेर येईल. त्यामध्ये जे कोणी सहभागी होते त्यांची देखील नावे लवकरच बाहेर येतील, असे संकेत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत.
या योजनेच्या कामाची निविदा प्रक्रिया २००९-१० मध्ये पूर्ण झालेली असतानाही अद्यापपर्यंत ही योजना पुर्णत्वास गेली नाही. धरण शंभर टक्के भरल्यानंतरही त्याचाही शेतकऱ्यांना फायदा झाला नाही. तेरणा बंद पाईपलाईन ही योजना गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाने ८ फेब्रुवारी २००८ रोजी जाहीर केली होती. तेरणा बंद पाईपलाईन व ठिबक सिंचनाने लाभक्षेत्रास लाभ देण्यासाठी ही योजना महत्वपूर्ण ठरणार आहे.
या योजनेची निविदा प्रक्रिया २००९-१० मध्ये पार पडली, मात्र दरवेळी टेस्टिंग होणार अस सांगून तेवढेच सोपस्कार करुन ही यंत्रणा पुढे काहीच करत नसल्याचे आजवरचे चित्र आहे. धरण असूनही शेतकऱ्यांना मात्र पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागतो. ठेकेदारांस रक्कमसुध्दा देण्यात आलेली असून मुळ निविदा किंमत ११ कोटी १८ लाख रुपये असताना ठेकेदाराला आतापर्यंत ३८ कोटी रुपये या कामासाठी मिळालेले आहेत. आता या सर्व बाबी तपासल्या जाणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सीबीआय, ईडी काय भाजपाचे कार्यकर्ते आहेत का?’, संजय राऊतांचा परखड सवाल
- विनायक मेटेंच्या बैठकीत शिवसैनिकांचा राडा, आयोजकांकडून गुन्हा दाखल
- ‘तिला स्वतंत्र करा’; रिया चक्रवर्तीची मागणी
- ‘तपास यंत्रणांचा वापर विरोधकांसाठी करतात हे यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं’
- गरीब दलित विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळांचे अनुदान कधी सुरु होणार ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
