मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) छापा टाकला आहे. शुक्रवारी सकाळी ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानी तसंच त्यांच्या निकटवर्तीयांकडे छापे टाकले. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
अनिल देशमुख यांच्या घरी ईडीकडून झडाझडती सुरू आहे. या तपासासाठी 6 ते 7 अधिकारी नागपुरातील देशमुखांच्या घरी पोहोचले आहेत. अनिल देशमुख यांच्या घराबाहेर बंदोबस्तासाठी सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, झाडाझडती होताना अनिल देशमुख घरी नव्हते, तर त्यांची पत्नी आणि इतर कुटुंबीय उपस्थित होते.
आता अनिल देशमुख यांच्यावर ईडीकडून करण्यात येत असलेल्या या कारवाईवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरवात झाली आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील या कारवाईनंतर प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे.
सीबीआय, ईडी काय भाजपाची कार्यकर्ती आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन केंद्र सरकार विनाकारण त्रास देण्याचं काम करत असल्याचा आरोप देखील राऊत यांनी केला आहे. तर, राज्यातील नेत्यांवर विनाकारण आरोप करुन त्याचं राजकीय अस्तित्व नष्ट करण्याचा प्रकार केला जाता असल्याची टीका देखील संजय राऊत यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘तपास यंत्रणांचा वापर विरोधकांसाठी करतात हे यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं’
- कबीर बेदींनी मुलाच्या आत्महत्यानंतर व्यक्त केलं दुःख
- ‘जर झेपत नसेल तर राजीनामा द्या’, सुप्रिया सुळेंनी महापौरांना सुनावले
- इतर पक्षातील नेते आपल्या पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावा सर्वपक्षीय नेते का करत आहेत ?
- #HBD : मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री ‘सई ताम्हणकरला’ वाढदिवसाच्या शुभेच्छा…


