🕒 1 min read
उस्मानाबाद : जिल्ह्यात पावसाने दोन दिवसांपासून उसंत घेतली आहे. गेले दोन दिवस पाऊस न पडल्याने पूर ओसरत आहे. सोबतच शेतातील पाणी ओसरत आहे. पूर ओसरल्यानंतर आता नेमकं किती नुकसान झालं आहे हे चित्र वरचेवर स्पष्ट होत आहे. शेतीचे नेमके किती नुकसान झाले? किती जमीन खरडून गेली? याचे पंचनामे आता सुरू झाले आहेत. दोन दिवस पाऊस पडला नसला तरी काही शेतात आज घडीला पिकात पाणी दिसत आहे. आता ही पिके कुठल्याच कामाची नसून हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे वाहून गेला, त्यामुळे आता कसं जगावं? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
जिल्ह्यातील शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. दोन लाख हेक्टरवरील खरिपाची पिकं पूर्णपणे उध्वस्त झाली आहेत. शेतामध्ये सध्या पूर्ण चिखल आहे. त्यामुळे शेतातल उभं पीक जागेवरच कुजू लागलं आहे. सोयाबीनला कोंब फुटू लागले आहेत. त्यामुळे या पिकातून शेतकऱ्यांना एक रुपयाचीही दमडी हाती येणार नाही. या उलट शेतातील उभं पीक काढायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
पाहणी, पंचनामे, आश्वासन नको थेट मदत करा, अशी मागणी शेतकरी सरकारकडे करीत आहेत. तसेच शासनाने पंचनामे न करता तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा व सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी ही सध्या जोर धरत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई इंडियन्स इतिहासाची पुनरावृत्ती करू शकणार नाही : वीरेंद्र सेहवाग
- धर्मांतरण प्रकरणात उत्तर प्रदेश ATS ने केली यवतमाळच्या धीरज जगतापला अटक
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- पेट्रोल-डिझेलच्या किंमती सर्वसामान्यांना न परवडणारे; जाणून घ्या आजचे दर
- ‘शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागा;त्यांना पुण्यात गुंतवून ठेवू नका’

