🕒 1 min read
पुणे : कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक तालुक्यात जनजीवन ठप्प झाले आहे. कोल्हापुरातील नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच अनेक रस्त्यांवर पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. तसेच कोल्हापूर मध्ये जलशुद्धीकरणाचे काही प्लांटस बंद पडले आहेत. पंपिंग स्टेशन मध्ये पाणी घुसून साचल्याने पंपिंग यंत्रणा बंद पडली आहे.
याच पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या वतीने कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात देवू केला आहे. पुण्यातून पूरग्रस्तांसाठी पिण्याच्या पाण्याचे १७ टँकर कोल्हापूरात पोहेचले आहे. पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरल्याने कोल्हापूर महापालिकेची पंपिंग यंत्रणा तसेच जलशुद्धीकरणाचे प्लांट्स बंद आहेत. यामुळे आपत्ती च्या काळामध्ये, जितकी शक्य होईल तितकी मदत इतर शहरांना करायची पुणे महानगरपालिकेची परंपरा चालू ठेवण्यात आलेली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या वतीने कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात..!पूरग्रस्तांसाठी पिण्याच्या पाण्याचे १७ टँकर कोल्हापूरात पोहेचले आहे.पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरल्याने कोल्हापूर महापालिकेची पंपिंग यंत्रणा तसेच जलशुद्धीकरणाचे प्लांट्स बंद आहेत. #PMC #PUNE #Kolhapur pic.twitter.com/4MtZK84clT
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) July 26, 2021
टँकर्स बरोबर supervisor, electrician, इ असे एकूण २१ जण आज सकाळी कोल्हापूर ला सुखरूप पोहोचले. साधारण एक आठवड्याच्या कालावधीची तयारी करण्यात आली आहे. या कालावधी मध्ये सगळ्यांच्या निवासाची तसेच खाण्याची सम्पूर्ण सोय कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- उद्धव ठाकरेंनी बोलावली वर्षावर तातडीची बैठक- पूरस्थितीचा घेणार आढावा
- पाणी उपसा केंद्र बुडाल्याने सांगली, कुपवाडचा पाणी पुरवठा तीन दिवस बंद राहणार
- तळिये, चिपळूणवासियांना दिला देवेंद्र फडणवीस यांनी धीर ; केला कोकणचा दौरा
- ‘उद्धव ठाकरे पांढऱ्या पायाचे! ते मुख्यमंत्री झाल्यापासून कोरोना आला, वादळं आली’
- गुजरातमध्ये पुन्हा एकदा 50 टक्के क्षमतेनं 9 वी ते 11 वी चे वर्ग सुरु होणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
