सांगली – महापुरात महापालिकेचे पाणी उपसा केंद्र बुडाल्याने सांगली आणि कुपवाड या दोन शहरांना होणारा पाणीपुरवठा पुढचे तीन दिवस ठप्प राहणार आहे. या काळात महापालिकेच्यावतीने टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून यासाठी टँकर सुरू आहेत. कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे महापालिकेचे पाणी उपसा केंद्र पुराच्या पाण्यात बुडाले आहे. सध्या नदीची पाणीपातळी जास्त आहे. हे पाणी ओसरले शिवाय पाणी उपसा केंद्राजवळ पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना जाता येत नसल्यामुळे सांगली आणि कुपवाड या दोन शहरांना पाणीपुरवठा बंद झाला आहे.
दरम्यान, कृष्णा नदीची पाणी पातळी कमी करण्यासाठी वारणा धरणातील विसर्ग कमी केला आहे. कृष्णा-वारणा नदीचा संगम असलेल्या हरिपूर संगमावर वारणा नदीचा वेग अधिक असल्याने कृष्णा नदीतून पाणी उतरण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे पाऊस कमी होऊन सुद्धा सांगलीत पाणी पातळी अजून कमी होत नाही आहे. वारणा धरणातून 14630 क्युसेक्स चालू असलेला विसर्ग कमी करुन 8720 क्युसेक्स इतका करण्यात आला आहे. जिल्ह्यात रविवारी दिवसभरात कृष्णा व वारणा नदीच्या पाणीपात्रात काहीठिकाणी घट तर काहीठिकाणी वाढ झाली आहे.
सांगलीतील आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी बारा तासात ५२ फुटांवरुन ५५ फुटांपर्यंत गेली. त्यामुळे गावठाणासह शहराच्या अनेक उपनगरांमध्ये पाणी शिरले. सांगलीसह सांगलीवाडी, हरीपूर, मिरज, अंकली याठिकाणच्या पाणी पातळीतही रविवारी दुपारपर्यंत वाढ झाली होती. त्यामुळे अनेक लोकांचे स्थलांतर करण्यात आले. अद्याप हजारो लोक महापुराच्या कचाट्यात सापडले असून, त्यांच्या सुटकेसाठी जवानांमार्फत रविवारी दिवसभर बचावकार्य सुरु होते.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यावरील पुराचे संकट आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- ‘सर्व ओटीटी वरील फिल्म्स आणि वेबसिरीज सेन्सॉर बोर्डाच्या नियमाखाली आणण्याबाबत विचार व्हावा’
- तळिये, चिपळूणवासियांना दिला देवेंद्र फडणवीस यांनी धीर ; केला कोकणचा दौरा
- ‘उद्धव ठाकरे पांढऱ्या पायाचे! ते मुख्यमंत्री झाल्यापासून कोरोना आला, वादळं आली’
- गुजरातमध्ये पुन्हा एकदा 50 टक्के क्षमतेनं 9 वी ते 11 वी चे वर्ग सुरु होणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

