🕒 1 min read
मुंबई:- एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी शरजिल उस्मानी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील स्वारगेट पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला याआधीच अनेकांनी विरोध केला होता. मात्र, पुणे पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर एल्गार परिषद ३० जानेवारीला पार पडली.
शरजिल उस्मानी याने पुणे येथील एल्गार परिषदेत भाषणाची सुरुवात करतानाच, ‘आजचा हिंदू समाज सडला आहे. मी इथे एक अल्पसंख्याक तरुण म्हणून आलो असून युद्धाची सुरुवात करण्यासाठी आलो आहे,’ असे आक्षेपार्ह विधाने त्याने केली होती. यावरून आता भाजपने आक्रमक भूमिका घेत अजूनही राज्य सरकार व पोलीस कारवाई का करत नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.
दरम्यान, हिंदू समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शरजील उस्मानी याच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिलं आहे. हे पत्र आता महाराष्ट्र भाजपचे पदाधिकारी अमरजीत मिश्र यांनी योगी यांच्याकडे सुपूर्द केलं आहे. उस्मानीवर लवकरच कारवाई होईल असे आश्वासन योगी यांनी दिल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.
हिंदू समाजाविरुद्ध गरळ ओकणाऱ्या शरजिल उस्मानीविरोधात कारवाई करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री @myogiadityanath यांना पत्र लिहिले होते. महाराष्ट्र भाजपाचे पदाधिकारी अमरजीत मिश्र यांनी हे पत्र योगी जींकडे सुपूर्द केले असून उस्मानीवर लवकरच कारवाई होईल, असे आश्वासन त्यांनी दिले. pic.twitter.com/k5An20jhI6
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) February 5, 2021
महत्वाच्या बातम्या
- राज्यात पुन्हा सुरु झालेली ‘ऑपरेशन लोटस’ची चर्चा केवळ बुडबुडा ठरणार ?
- पोलिसांनी खिळे ठोकलेल्या जागेवरच आम्ही फुलं लावणार – राकेश टिकैत
- खा. इम्तियाज जलील, खा. फौजिया खान यांची महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर निवड
- बंगालमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दले तैनात करा ; भाजपची मागणी
- पॉवरग्रीडचे कार्यालय फोडणाऱ्यांना 9 तासांत अटक; 2 लाखांचा मुद्देमाल जप्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
