Share

विराट कोहली, रोहित शर्माच्या ‘या’ फोटोवर पडतोय मिम्सचा पाऊस

Published On: 

🕒 1 min read

चेन्नई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघातकडे सर्वांचे लक्ष आहे.  टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात पेटीएम कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईतील पेटीएम कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळाला 6 फेब्रुवारी सुरुवात झाली आहे. कर्णधार जो रुट आणि बेन स्टोक्स ही जोडी खेळत आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडला रोखण्याचे आव्हान असणार आहे.

इंग्लंड विरुद्धच्या चेन्नई कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी देखील पंतचे एक नवे रूप बघायला मिळाले. यावेळी पंत तालासुरात एक वाक्य बोलताना दिसला. सामन्याच्या पहिल्या दिवशी जो रुट व डॉम सीबली फलंदाजी करत असताना भारताचा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर त्यांना गोलंदाजी करत होता. यावेळी पंत काही मजेशीर कॉमेंट्स करत होता. स्टम्प माइक मध्ये आलेल्या आवाजानुसार पंत म्हणाल ,”मेरा नाम है वॉशिंग्टन मुझे जाना है डीसी.” रिषभ पंतची विकेटच्या मागे बडबड सुरु असताना सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी कर्णधार विराट कोहली  आणि सलामी फलंदाज रोहित शर्मा यांची फिरकी घेतली

शाहबाझ नदीमच्या चेंडूवर रूटने मारलेला चेंडू बाउंड्री लाईनच्या पार जाताना कोहली आणि रोहित त्यांच्या चेहऱ्यावर असहाय्य भावाने टक लावून पाहत असतानाचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला त्यानंतर नेटिझन्सने ट्विटरवर भन्नाट मिम्सचा पाऊस पाडला. त्या व्हायरल फोटोवर यूजर्सने मिम-फेस्ट केला आणि काही क्षणातच फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला. फोटोवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया पहा.

https://twitter.com/RohitianShubham/status/1357639662316126209?s=20

https://twitter.com/manoj__45_/status/1357659156258254850?s=20

https://twitter.com/JaiswalVarrnit/status/1357655784432271360?s=20

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!