🕒 1 min read
नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी क्रिकेटर वसीम जाफर (Wasim Jaffer) सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि क्रिकेट सामन्यांबद्दलचे सर्व मीम्स शेअर करत असतो. जाफर आणि इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन (Michael Vaughan) यांच्यात ट्विटरवर अनेकदा शाब्दिक वाद झाले आहेत. दोघेही एकमेकांना खेचण्याची एकही संधी सोडत नाहीत.
अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात इंग्लंडचा डाव अवघ्या 68 धावांत आटोपला आणि ऑस्ट्रेलियाने मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे खेळली जाणारी बॉक्सिंग कसोटी अडीच दिवसांत एक डाव आणि 14 धावांनी जिंकली. इंग्लंडच्या या लाजिरवाण्या पराभवानंतर जाफरने वॉनला त्याच्या जुन्या ट्विटची आठवण करून दिली आहे. ज्यात त्याने टीम इंडिया ९२ धावांवर ऑलआऊट झाल्याची खिल्ली उडवली होती.
31 जानेवारी 2019 रोजी, न्यूझीलंडने पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला केवळ 92 धावांत गुंडाळले होते. भारताने मात्र ती वनडे मालिका ४-१ ने जिंकली. भारतीय संघ फक्त एकच सामना हरला होता, पण अत्यंत लाजिरवाण्या पद्धतीने हरला होता. वॉनने भारतीय संघाची खिल्ली उडवत ट्विटरवर लिहिले, ’92 भारत ऑल आउट… आजकाल कोणताही संघ 100 पेक्षा कमी धावांवर ऑलआऊट होऊ शकतो यावर विश्वासच बसत नाही.’
England 68 all out @MichaelVaughan ???? #Ashes pic.twitter.com/lctSBLOsZK
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) December 28, 2021
ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिका जिंकली आहे. पहिले तीन कसोटी सामने जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेत ३-० अशी आघाडी घेतली. अॅशेस मालिकेदरम्यान इंग्लंड संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. खुद्द मायकेल वॉनही इंग्लंडच्या खेळाने खूप निराश आहे. एमसीजी कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव 185 धावांवर आटोपला, त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डावही 267 धावांवर आटोपला. एवढ्या कमी आघाडीनंतरही ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 68 धावांवर ऑलआउट केले आणि एक डाव आणि 14 धावांनी सामना जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या
- रुईकर कुटूंबियांना शिवसेनेतर्फे ५ लाखाची मदत; शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी घेतली कुटुंबियांची भेट!
- असे भ्याड हल्ले करणारे निर्दोष सुटता कामा नये; खडसे हल्ला प्रकरणी चाकणकरांची प्रतिक्रिया
- “…तरीही राज्यपाल अडथळा आणत असतील तर त्यांच्यावर दबाव आहे”, संजय राऊतांचा हल्लाबोल
- गुंडांनी भगवी वस्त्र धारण केल्यास त्यांना संत म्हणता येणार नाही; छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची टीका
- “अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यांना तत्काळ अटक करा”, चित्रा वाघ आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

