Share

लॉर्ड्सच्या खेळपट्टीला पाहून वसीम जाफरने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : इंग्लंडच्या दौऱ्यसाठी भारतीय संघ नुकताच इंग्लंडला पोहोचला आहे. साउथहॅम्पटन येथे भारतीय संघ सध्या विलगीकरणात राहणार आहे. विलगीकरण कालावधी संपल्यानंतर भारताला न्युझीलंड सोबत जागतीक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे.

यादरम्यान इंग्लंड आणि न्युझीलंड संघात २ कसोटी सामन्याची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना लॉर्ड्स येथे खेळवीला जात आहे. या सामन्यातील खेळपट्टी बघुन भारतीय माजी क्रिकेटपटु वसीम जाफरने एक ट्विट करत या खेळपट्टीला चक्क ‘हरा भरा कबाब’ अशी खंमग उपमा दिली आहे. लॉर्ड्सची खेळपट्टी हिरवीगार दिसत असल्याने जाफरने गमतीने हे ट्विट केले आहे. या खेळपट्टीचा फोटो पोस्ट करताना ‘ असे भासत आहे की इंग्लंडने स्टार्टर मध्ये हरा भरा कबाब मागविला आहे.’ असे म्हणाला आहे.

काही महिन्यापुर्वी जेव्हा भारताच्या दौऱ्यावर आला होता. त्यावेळी भारतातील खेळपट्टीवर अनेक विदेशी खेळाडुंनी टिका केली होती. त्यामुळे त्याचा सुड उगवण्यासाठी जाफरने हे ट्विट केले असल्याची सोशल मीडीयावर चर्चा सुरु आहे. या दौऱ्यात भारतीय संघ न्युझीलंडविरुद्ध १८ ते २२ जुन दरम्यान जागतीक कसोटी चॅम्पीयनशिप स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. यानंतर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!