मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) फिरकीपटू युजवेंद्र चहलला चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) सोबत खेळायचे आहे. विराट कोहलीच्या आरसीबीकडून खेळलेला चहल म्हणाला, ‘आरसीबी नाही तर मला आयपीएलमध्ये सीएसकेकडून खेळायला आवडेल.’
चहल 2014 पासून आरसीबीशी संघाकडून खेळत आहे . मात्र, आयपीएल -14 मध्ये त्याची कामगिरी काही खास नव्हती. दरम्यान भारतामध्ये कोरोना संसर्गामुळे आयपीएल 2021फक्त 29 सामन्यांनंतर पुढे ढकलण्यात आली. मात्र, आयपीएलचे उर्वरित सामने लवकर होणार अशी घोषणा बीसीसीआयने केली आहे.
एका मुलाखतीत जेव्हा चहलला आरसीबीऐवजी कोणत्या टीमकडून खेळायला आवडेल असे विचारण्यात आले असता, चहल म्हणाला की, मला सीएसकेसाठी खेळायला आवडेल. २०११ मध्ये मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाल्यानंतर चहलला पदार्पण करण्यासाठी 2013 पर्यंत थांबावे लागले. त्या मोसमात तो एकच सामना खेळला.
यानंतर त्याला 2014 मध्ये आरसीबीने खरेदी केले होते. कोहलीच्या या टीमसाठी चहल सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा आहे. गेली 8 वर्षे तो प्रत्येक सत्रात 13 हून अधिक सामने खेळला आहे. आयपीएल -14 चे उर्वरित 31 सामने युएईमध्ये खेळले जातील. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ही स्पर्धा होईल. बीसीसीआयच्या नुकत्याच झालेल्या एसजीएममध्ये हा निर्णय घेण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
- ‘गुणरत्न सदावर्ते मराठाविरोधी, त्यांना भाजपचा पाठिंबा आहे का याचा तपास केला पाहिजे’
- ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ मधील पंचरत्न पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला
- टी -20 वर्ल्ड कप युएईमध्ये आयोजित केला जाईल ; पीसीबी अध्यक्षाचा दावा
- अमेरिकेने लसीच्या निर्यातीवरील निर्बंध हटवले, भारतात लसींचे उत्पादन वाढणार
- शिवराज्यभिषेक दिनी शासकीय कार्यालयात भगवा ध्वज उभारण्यास गुणरत्न सदावर्तेंचा विरोध


