Share

वासिम जाफरने केले रोहित शर्माचे कौतुक; म्हणाला “विराट कोहलीपेक्षा चांगला कसोटी कर्णधार…”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएलमध्ये आपल्या नेतृत्व कौशल्याने सर्वाधिक प्रभावित केल्यानंतर, स्टार फलंदाज रोहित शर्मा टीम इंडियासोबत अगदी तेच करत आहे. रोहितच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने कसोटीत श्रीलंकेला २-०ने क्लीन स्वीप केले. यापूर्वी मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये न्यूझीलँड आणि वेस्ट इंडिजविरुद्धही असाच पराक्रम हिटमॅनच्या आर्मीने करून दाखवला होता. यामुळे रोहितचे सगळीकडून कौतुक होत आहे.

माजी खेळाडू वासिम जाफरने (wasim jaffer) मुंबईकर रोहित शर्माचे (rohit sharma) कौतुक करत बरोबर नेतृत्व बरोबर कर्णधारकडे गेले असल्याचे सांगितले आहे. तो म्हणाला,” रोहित शर्मा विराट कोहलीपेक्षा चांगला कसोटी कर्णधार होऊ शकतो. तो किती कसोटी सामन्यात कर्णधार असेल हे माहीत नाही, पण कुशल कर्णधारांपैकी तो एक सर्वोत्तम कर्णधार आहे असे मला वाटते. त्याने प्रत्येक मालिकेत कसे व्हाईटवॉश केले याचे परिणाम आपण पाहत आहोत. योग्य कर्णधाराच्या हाती कर्णधारपद आल्यासारखे वाटत आहे”

रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाने विक्रम रचले आहे. भारताने त्यांच्या १५ सामन्यात घरच्या मैदानावर एकही गमावला नाही त्यामुळे विजयाची टक्केवारी ९३.७ नोंदवली गेली. आशियाई संघांमध्ये नोंदवलेली ही सर्वाधिक विजयाची टक्केवारी आहे. २००८- ०९ च्या मोसमातील भारतीय संघाने पुढील सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. ज्यात घरच्या मैदानावर ११ पैकी आठ सामने जिंकले तर तीन अनिर्णित राहिले त्यामुळे विजयाची टक्केवारी ७२.७ नोंदवली गेली होती.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!