मुंबई: भारताचा माजी स्टार खेळाडू अजित आगरकर आयपीएल स्पर्धेत वापसी करत आहे. तो दिल्ली कॅपिटल्स संघासोबत सहाय्यक प्रशिक्षक म्हणून जोडला गेला आहे. आयपीएल स्पर्धेला २६ मार्चपासून सुरुवात होत आहे. मात्र याआधी इतर संघाबाबत बोलताना आगरकरने कोणालाही कमी समजणार नसल्याचे सांगितले आहे. यावेळी त्याने एका फ्रँचाइसीचे उदाहरण देत संघाच्या क्षमतेबाबत सांगितले.
अजित आगरकरने (Ajit agarkar) राजस्थान रॉयल्सचे (rajasthan royals) उदाहरण देत सांगितले,”T20 क्रिकेटमध्ये कोणताही मजबूत किंवा कमकुवत संघ नसतो. आपल्याकडे आयपीएलच्या संपूर्ण आवृत्त्यांमध्ये पुरेसे पुरावे आहेत की कोणत्याही संघाला पराभूत करणे सोपे नाही. जर तुम्ही आयपीएलच्या पहिल्या आवृत्तीत राजस्थान रॉयल्स पाहिला तर, त्यांनी ऑक्शनमध्ये निवडलेल्या संघावर प्रत्येकजण हसत होता, परंतु ते पुढे गेले. आणि त्यांनी ट्रॉफी जिंकली.”
अजित आगरकर एका दशकानंतर आयपीएलमध्ये पुन्हा दिल्ली संघासोबत पुनरागमन करत आहे. तो याआधी काही काळ दिल्लीकडून खेळला आहे. त्यासोबतच दिल्ली कॅपिटल्सने शेन वॉटसनलाही सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. यंदाच्या हंगामात ऋषभ पंत दिल्लीचे नेतृत्व सांभाळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘तेव्हा आम्ही बघूच की कोण आयपीएल खेळायला जातो’ ; पीएसएलमध्ये मोठा बदल आणण्याचे रमीज राजांचे संकेत
- IPL 2022: सुरेश रैना आयपीएलमध्ये परतणार; यंदा मात्र एका नवीन रूपात!
- जळगावात विद्यार्थिनीने दिला रोड रोमिओला चोप; व्हिडिओ व्हायरल
- कवी कुमार विश्वासची ‘काश्मीर फाइल्स’वर जळजळीत प्रतिक्रिया
- रत्नागिरीत गावच्या वेशीबाहेर जाऊन होळी तोडण्याची प्रथा आजही कायम!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

