मुंबई : आषाढी एकादशी निमित्त संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या बसमधून पंढरपूरजवळ वाखरी इथं दाखल झाल्या आहेत. एकादशी निमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्क्मिनीची शासकीय पूजा करण्यात येत असती. पूजा करण्यासाठी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह सोमवारीच पंढरपूरला रवाना होणार आहे. विशेष म्हणजे ते स्वत: गाडी चालवित पंढरपुरात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबासह विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पूजेसाठी उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मु्ंबईतून स्वतः गाडी चालवत पंढरपूरात दाखल होणार आहेत. त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या पालख्यांसोबत फक्त 50 वारकऱ्यांना परवानी देण्यात आली आहे. यावरुनच भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका केली आहे.
केशव उपाध्ये यांनी एक ट्विट करुन यात मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ‘जनतेचे जिणे हराम, मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम. पावसाने मुंबईचा चक्का जाम, मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम. एमपीएससी विद्यार्थ्यांचा जीवनाला रामराम, तरीही मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम. तुका म्हणे माझा विठ्ठल झाकोळला. वारकरी भक्तांना बसवुनी घरी, फोटोमध्ये झळकती मुख्यमंत्री,’ अशा ओळींमधून उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
दरम्यान दरवर्षी शेकडो दिंड्या, पालख्यांसोबत हजारो वारकरी पायी वारी करत पंढरीत दाखल होत असतात. पण यंदा कोरोना संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी पायी वारी निघालेली नाही.. त्यामुळे मानाच्या १० पालख्यांनाच पंढरपूरला जाण्याची मुभा देण्यात आलीय. त्यासाठी प्रत्येक पालखीसोहळ्यासोबत ४० वारकऱ्यांना परवानगी आहे. पण त्यांना कोरोना चाचणीची अट कायम ठेवण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ठाकरेंची तिसरी पिढी असफल’, मुंबईत साचलेल्या पाण्यामुळे खासदार नवनीत राणांचा हल्लाबोल
- पेगासस प्रकरण : ‘अधिवेशनाच्या आदल्या दिवशी असे अहवाल प्रकाशित होणे हा योगायोग नाही’
- ‘ठाकरे सरकारमध्ये नेते कमी अन् बोलके पोपटच जास्त’, ओबीसी आरक्षणावरून फडणवीसांचा टोला
- ‘वाकला – चांदेश्वर जलप्रकल्प जलसंपदा विभागाला पुर्ण करण्याचे आदेश जारी’
- चित्रा वाघ यांनी केले संजय राऊतांचे कौतुक, म्हणाल्या… त्यासाठी केंद्राला जबाबदार धरले नाही!


