औरंगाबाद : क्रांती चौक हे शहराचे हृदय आहे. आणि येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शहराची आण-बाण-शान समजला जातो. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याचे काम गेल्या २ वर्षांपासून रखडले आहे. हे काम १९ फेब्रुवारी २०१८ ला शिवजयंतीचे औचित्य साधून सुरु करण्यात आले होते. उद्या (दि.१९) या कामास ३ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र यंदाही शिवप्रेमींचा हिरमोड झाला आहे. पुढील वर्षी तरी क्रांती चौकात पूर्वीप्रमाणेच थाटामाटात छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करता येवो अशी अपेक्षा शिवप्रेमींनी व्यक्त केली.
क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विशेष महत्त्व आहे. याठिकाणाहून अनेक सामाजिक, राजकीय चळवळी सुरू झाल्या. क्रांती चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याची मागणी शिवप्रेमींतून गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. वारंवार पाठपुरावा करून महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना जाब विचारल्यानंतर १९ फेब्रुवारी २०१८ ला कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
तत्कालीन महापौर नंदकुमार घोडेले यांनी हे काम वर्षभरात पूर्ण करण्याचा शब्दही दिला होता. कंत्राटदार नियुक्त करण्यात पालिकेचे वर्ष वाया गेले. नंतर पुढे गायत्री आर्किटेक कंपनीला हे काम दिल्यानंतर कंत्राटदाराने आधी पैसे द्या, अशी अडवणूक करत संथ गतीने काम सुरू केले. त्यामुळे आजवर हे काम पूर्ण झालेले नाही.दरम्यान, पालिकेले छत्रपती शिवरायांचा २१ फुट उंचीचा पुतळा बसविण्याचा निर्णय घेतला. त्याचीही निविदा प्रक्रिया राबवून एजन्सीला काम देण्यात आले आहे.
चबुतऱ्याचे काम अंतिम टप्प्यात
८ डिसेंबरला २०२० ला शिवरायांच्या पुतळा मॉडेलचे मनपाच्या माजी पदाधिकाऱ्यांसमोर सादरीकरण करण्यात आले होते. त्यावेळी लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचना विचारात घेत शिवरायांचा अश्वारूढ पुतळा तयार करण्यास मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी मान्यता दिली. पुणे येथील शिल्पकार दीपक थोपटे यांनी क्ले मॉडेल तयार करण्यास सुरुवात झाली असून क्रांती चौकातील क्राँक्रिट कास्टिंगचे काम सुरु असून हे काम अंतिम टप्प्यापर्यंत पोहचले आहे. लवकरच चबुतरा तयार होईल अशी माहिती महानगरपालिकेद्वारे देण्यात आली.
महत्वाच्या बातम्या
- खड्डे आणि पाण्यासाठी कॉंग्रेस आक्रमक, मनपासमोर आंदोलन
- कोरोनाचा कहर, औरंगाबादेतील शाळा पुन्हा एकदा बंद
- लॉकडाऊन करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाकडे : मुख्यमंत्र्यांचे आदेश
- ‘हे सरकार आपल्याच आमदारांना घाबरतंय, एखाद्या घडामोडीमुळे सरकार पडण्याची त्यांना भीती आहे’
- ‘चेहरा लोकशाहीचा, आत्मा हुकूमशाहीचा आणि कृती परिवार सेवेची’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

