औरंगाबाद : टाऊन हॉल ते मकई गेट या रस्त्याची अतिशय दुर्दशा झालेली आहे. मोठमोठे खड्डे याठिकाणी पडलेले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना येथून जातांना मोठा त्रास सहन करावा लागतो. २०१४ मध्ये या रस्त्याचे काम करण्यात आले होते. त्यानंतर आजतागायत हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. यासाठी वारंवार मनपाकडे पाठपुरावा केला मात्र कोणतीही हालचाल करण्यात आलेली नाही. त्यामुळे आज (दि.१८) औरंगाबाद काँग्रेस जिल्हा कमिटीद्वारे महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले.
सन २०१३ मध्ये वरील रस्ता तयार झाला होता. त्यानंतर थातुरमातूर डागडुजी करुन काम केले. दर पावसाळयात वाहत्या पाण्यामुळे याठिकाणी खड्डे पडतात. याबाबत प्रशासनाला तक्रार केली. परंतु आजपर्यंत रस्त्यांचे कामे करण्यात आलेले नाही. टॉऊन हॉल ते मकई गेट व्हाया घाटी, प्रगती कॉलनी, व्हीआयपी रोड हा लवकरात लवकर बनविण्यात यावा. अशी मागणी औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी द्वारे करण्यात आली आहे.
तसेच घांडी परिसर हा शहरातील अतिशय उंच भागात असून या ठिकाणी कमी दाबाने पाणी येते येथील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी या ठिकाणी लवकरात लवकर पाण्याची टाकी बांधण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे सन 2015 पासून नागरिकांनी ही मागणी केलेली आहे मात्र आजपर्यंत महानगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे तरी लवकरात लवकर खड्डेमय रस्ता आणि पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मनपाने पुढाकार घ्यावा यासाठी काँग्रेस जिल्हा कमिटी द्वारे आंदोलन करण्यात आले यावेळी अध्यक्ष इक्बाल सिंग गिल,अनिल घोडके, असद अली,बंटी निकाळजे, राहुल शिरसाठ आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
महत्वाच्या बातम्या
- ‘अमिताभ बच्चन यांचा मेमरी लॉस झाला आहे का?’
- स्मशान भूमीत २० तर मंगल कार्यालयात ५० जणांना परवानगी, अन्यथा दाखल होणार गुन्हे
- शेतकरी आंदोलन पुन्हा उसळणार ! ४० लाख ट्रॅक्टर दिल्लीत आणण्याचा राकेश टिकैत यांचा इशारा
- काँग्रेसच्या रॅलीत कोरोना नियमांचा बट्ट्याबोळ ! शिवजयंतीवर निर्बंध पण राजकीय पक्षांना लगाम घालणार कोण ?
- फर्दापूरतांडा येथील कल्पवृक्ष तिर्थक्षेत्रावर बसस्थानकाचे काम सुरु


