औरंगाबाद : शहरात कोरोनाचे रूग्ण वाढतांना दिसत आहेत. त्यामुळे महापालिकेने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. २३ नोव्हेंबरपासून औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्यात आल्या. त्यानंतर शहरातील शाळा ४ जानेवारीपासून सुरु झाल्या. शाळा उघडून एक ते दीड महिना होत नाही तोच गुरुवारी (दि.१८) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत १०, १२ वी वगळता इतर सर्व वर्गांना सुट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी हा निर्णय जाहीर केला.
सध्या शहरात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर काल महानगरपालिकेकडून अनेक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. आज (दि.१८) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत 10 वी आणि 12 वीचे वर्ग वगळता इतर वर्ग विद्यार्थ्यांना येत्या २८ फेब्रुवारी पर्यंत सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये विद्यार्थी आणि पालकांसाठी हा निर्णय ऐच्छिक ठेवण्यात आला आहे.
जर पालक आपल्या पाल्यांना पाठवू इच्छित असतील तर यात कुठलीही अडचण नाही. शाळा पूर्णपणे बंद नसतील. शाळेतील शिक्षक इतर व्यवस्थापन सुरूच राहील अशी माहिती यावेळी देण्यात आली. येत्या २८ तारखेपर्यंत ही सुट कायम असणार आहे. त्यानंतरचा निर्णय प्रशासन घेईल. यावेळी मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, पोलीस आयुक्त निखील गुप्ता, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांची विशेष उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सरकारच्या आशीर्वादाने पोलीस पूजा चव्हाण केस दाबण्याचा प्रयत्न करत आहेत’
- वयाच्या ८८ व्या वर्षी भारताचे ‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन करणार भाजपात प्रवेश
- ‘नाना पटोलेंचे ‘ते’ विधान केवळ प्रसिद्धीसाठी’ : फडणवीस
- ‘या’ तारखेला लाँच होणार स्कोडाची पहिली मेड इन इंडिया ‘संस्कृत’ नाव असलेली SUV कार
- अजानच्या आवाजाने अभिनेत्याची उडाली झोप; थेट मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी


