मुंबई : पेट्रोलने शंभरी गाठली असतानाही अमिताभ बच्चन, अक्षयकुमार यासह एकाही सेलिब्रिटीने त्याविरोधात ट्विट का केले नाही, ते आता गप्प का आहेत? मोदी सरकारच्या हुकूमशाही विरोधात बोलण्याची त्यांची हिम्मत होत नाही का? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी काल पत्रकार परिषदेत उपस्थित केला होता.
काल गांधी भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना नाना पटोले यांनी बॉलीवूड अभिनेत्यांसह मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. आजही नाना पटोले याच मुद्द्यावरून अमिताभ बच्चन व अक्षयकुमार यांच्यावर बरसले आहेत. अमिताभ आणि अक्षय यांना शेतकऱ्यांचा विसर पडल्याने, त्यांच्या चित्रपटाचे शुटींग आणि त्यांचे सिनेमे बंद पाडू, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे.
दरम्यान, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नाना पटोलेंच्या भूमिकेवर भाष्य केले आहे. ‘नाना पटोले यांच्या भावनेतून आणि भाषेतून खरा काँग्रेसचा चेहरा व्यक्त होत आहे. त्यांचा चेहरा लोकशाहीचा, आत्मा हुकूमशाहीचा आणि कृती परिवाराची सेवा करायची, असं काँग्रेसचं वर्णन आहे’, असा घणाघात मुनगंटीवार यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मुबलक वाळुसाठा नसतांना पैठण तालुका प्रशासनाचा लिलावाचा बनाव !
- वयाच्या ८८ व्या वर्षी भारताचे ‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन करणार भाजपात प्रवेश
- ‘नाना पटोलेंचे ‘ते’ विधान केवळ प्रसिद्धीसाठी’ : फडणवीस
- ‘या’ तारखेला लाँच होणार स्कोडाची पहिली मेड इन इंडिया ‘संस्कृत’ नाव असलेली SUV कार
- अजानच्या आवाजाने अभिनेत्याची उडाली झोप; थेट मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

