Share

लॉकडाऊन करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाकडे : मुख्यमंत्र्यांचे आदेश

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाल्यानंतर हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथीलता करण्यात आली. त्यामुळे कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून राज्यात सर्व काही पूर्ववत होत आहे. पण काही जण कोरोना संदर्भातील नियम पाळत नसल्यामुळे आता कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

सध्या कोरोनाचं संकट महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा डोकं वर काढत असताना दिसतंय. राजकीय पक्षांचे कार्यक्रम, लग्न समारंभ, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. यामुळेच महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानं स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले. अकोला, यवतमाळ आणि अमरावतीमध्ये कोरोना संसर्ग वाढल्यानं मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनाला उपाययोजना करण्याचे अधिकार दिले आहेत.

तसेच लॉकडाऊन करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती अनिल परब यांनी दिली. राज्यात कोरोना रुग्ण वाढत असून कडक नियम लागू करण्याची गरज आहे, असंही अनिल परब म्हणाले. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवशेन टप्प्या टप्प्यानं वाढवण्यात येईल. २५ फेब्रुवारीला याबाबत बैठक घेण्यात येईल आणि त्याबाबत निर्णय होईल, अशी माहिती देखील अनिल परब यांनी यावेळी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!