🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सगळेच नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. भाजपचे नेते आणि संजय गांधी यांचे चिरंजीव वरून गांधी यांची पुन्हा घसरली आहे. त्यांनी सपा-बसपाला मतदान म्हणजे पाकिस्तानला मतदान असं वादग्रस्त विधान केलं आहे.
भाजपाचे उमेदवार वरुण गांधी पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. पिलीभितमधील सभेत त्यांनी समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टीला मतदान म्हणजे पाकिस्तानला मतदान, असं वादग्रस्त विधान वरुण गांधींनी प्रचारसभेत केलं आहे. सपा-बसपाचं महागठबंधन पाकिस्तानचं प्रतिनिधीत्व करतं. त्यामुळे पाकिस्तानऐवजी भारतमातेसाठी मतदान करा, असं आवाहन गांधींनी केलं आहे.
दरम्यान, यापूर्वी त्यांनी मी संजय गांधी यांचा पुत्र आहे. मी एक गोष्ट जनतेला समजावून सांगतो. येथे कोणालाही भिण्याची गरज नाही. मी येथे उभा आहे. मी विरोधकांकडून आपले जोड्यांची लेस बांधून घेतो असं वक्तव्य केले होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

