Share

विवेक ओबेरॉयला विनामास्क बाईक राईड पडली महागात ; मुंबई पोलिसांची कारवाई

Published On: 

मुंबई : अभिनेता विवेक ओबेरॉय याला दंड ठोठावण्यात आला आहे. विनाहेल्मेट आणि विनामास्क बाईक चालवल्याने विवेकवर कारवाई करण्यात आली. विवेकला 500 रुपयांचे ई-चलान पाठवण्यात आले आहे. तर मुंबईतील जुहू पोलीसात विवेक ऑबेरायवर गुन्हा नोंदवल्याचीही माहिती आहे.

मध्यंतरी विवेक ओबेरॉयने बाईक राईडचा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. त्याखाली त्याने कॅप्शनही दिलं होतं. ‘व्हॅलेंटाइन डेची मस्त सुरुवात… मी, माझी बायको आणि ती… रिफ्रेश करणारी जॉयराईड’ अशा आशयाचं कॅप्शन विवेकने दिलं होतं.

https://www.instagram.com/tv/CLRc1INHVpi/?utm_source=ig_web_copy_link

विवेकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सामाजिक कार्यकर्ते डॉ. बिनू वर्गीस यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करत काही प्रश्न उपस्थित केले. विवेकने हेल्मेटविना बाईक चालवून वाहतूक सुरक्षा नियम मोडला आहे. तसेच मास्क न घातल्याने तोही नियमभंग ठरतो. युवा पिढीसमोर चुकीचा संदेश जात असल्याचं वर्गीस यांनी लिहिलं होतं. वर्गीस यांच्या या ट्वीटची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेतली. त्यानंतर विवेकवर गुन्हा दाखल करण्यात आला. विवेकला 500 रुपयांचं चलानही मोबाईलवर पाठवण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!