टीम महाराष्ट्र देशा – छत्रपती उदयनराजे लोकप्रतिनिधी आहेत. लोकभावना व्यक्त करणे चुकीचे नाही. त्यांचा अधिकार आहे. याचा अर्थ प्रशासनाला आव्हान देत आहेत, असा होत नाही. सातारा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख हे खासदार उदयनराजे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी संवाद साधत आहेत. गतवर्षीही अशीच स्थिती निर्माण झाली होती. मात्र, लोकप्रतिनिधींसह सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्यांनी पोलिस यंत्रणेला सहकार्य केल्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत आपल्या लाडक्या बाप्पाला लाखो भक्त आज निरोप देत आहेत. गेल्या १० दिवसांपासून मनोभावे सेवा केल्यानंतर सकाळपासून नाचत-गाजत बाप्पाच्या मिरवणुकांना सुरुवात झाली आहे.
दरम्यान,पुण्यानंतर कोल्हापुरमध्ये देखील शाहुपुरी पोलिसांनी डीजेविरोधात कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. डीजे सेट जोडणीसाठी घेऊन जात असलेल्या ४ बेस आणि ४ टॉप पोलिसांनी जप्त केले आहे. , पोलिसांनी जप्तीची कारवाई करत पोलिसांनी गणेश मंडळाना कडक संकेत दिले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाकडून डॉल्बीला परवानगी नाकारण्यात आल्यानंतर गणेश विसर्जन मिरवणुका पारंपरिक वाद्यानेच होणार आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यामध्ये पोलिसांनी डॉल्बीविरोधात धडक कारवाई करताना डहाणुकर कॉलनी जवळ एक मंडळाचा मिक्सर जप्त केला आहे.
पुण्यामध्ये डीजेविरोधात पोलिसांची धडक कारवाई; मिक्सर केला जप्त
‘डीजे’बंदी हटवा, नाहीतर विसर्जन करणार नाही; पुण्यातील गणेशोत्सव मंडळांची भूमिका
डीजेला बंदीला वाढता विरोध, अहमदनगरमध्येही विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

