Share

डीजेला बंदीला वाढता विरोध, अहमदनगरमध्येही विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा- विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवण्यास परवानगी न मिळाल्याने पुण्यापाठोपाठ अहमदनगरमध्येही गणपती मंडळांनी गणपती विसर्जन मिरवणुकीवरच बहिष्कार टाकलाय. डीजेला बंदी केल्याने गणपती विसर्जन मिरवणुकीवर माळीवाड्यातील बारा मानाच्या गणपती मंडळांचा बहिष्कार टाकला आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे लावायला परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यानंतर काल पुण्यातील काही राजकीय नेते मंडळी,सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि डिजे मालकांनी या निर्णयाविरोधात निदर्शने केली. बंदी न उठविल्यास गणेशमुर्ती विसर्जन न करता जागेवरच गणपती ठेवणार अशी अडेलतट्टूपणाची भूमिका मंडळांनी घेतली आहे.

दरम्यान,पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत आपल्या लाडक्या बाप्पाला लाखो भक्त आज निरोप देत आहेत. गेल्या १० दिवसांपासून मनोभावे सेवा केल्यानंतर सकाळपासून नाचत-गाजत बाप्पाच्या मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. यंदा घालण्यात आलेल्या बंदीविरुद्ध पुण्यातील गणेश मंडळांनी बंड पुकारले आहे. डीजेला परवानगी न दिल्यास, यंदा श्रींच्या मूर्तींचे विसर्जन न करता मूर्ती मांडवातच ठेवण्याचा इशारा गणेश मंडळानी शनिवारी दिला असून मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!