मुंबई : रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडल १२’ अनेकदा वादात सापडला आहे. काही दिवसांपूर्वी या सेटवर किशोर कुमार यांचा मुलगा आणि गायक अमित कुमार आले होते. त्यानंतर त्यांनी जो खुलासा केला त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच यातील स्पर्धकांमुळे ही चर्चा होत असते. आता पुन्हा एकदा या शोची चर्चा सुरू झाली असून, या शोच्या जजेस गायक विशाल ददलानी गेल्या तीन सिझनपासून या शोमध्ये जजची भूमिका पार पाडत आहे. मात्र यावेळी विशालने इंडियन आयडल शोमध्ये पुन्हा येण्यास नकार दिला आहे.
या शोमध्ये विशाल ददलानी सोबतच नेहा कक्कर आणि हिमेश रेशमिया जज म्हणून आहेत. मात्र महाराष्ट्रात लॉकडाउन लागू करण्यात आल्यानंतर शोच्या मेकर्सनी संपूर्ण टीमसोबत दमणमध्ये शूटिंग सुरू केलं. यावेळी नेहा कक्कर आणि हिमेशसोबतच विशालने देखील दमणमध्ये शूटिंगसाठी जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे जजेस म्हणून शोमध्ये मनोज मुंतशिर आणि अनु मलिक यांना घेण्यात आलं.
https://www.instagram.com/p/CNkZn7PlNhX/?utm_source=ig_embed&ig_rid=e6f19c68-f904-40d4-a1b1-725aeeec90c4
मात्र अलिकडे काही एपिसोडमध्ये नेहा आणि हिमेश झळकू लागले आहेत. मात्र विशाल ददलानीने शोमध्ये परतण्यास नकार दिलाय. या शोचा होस्ट आदित्य नारायणने एका मुलाखतीत यावर सांगितले की, ‘मागील वर्षीच विशाल त्याच्या आई-वडिलांसह लोणावळ्यामध्ये शिफ्ट झाला आहे. लोणावळ्याहून प्रवास करत दमणला जायचं आणि पुन्हा लोणावळा असा प्रवास करण्याची विशालची इच्छा नाही. यामुळे त्याच्या पालकांसाठी कोरोना संक्रमणाचा धोका वाढू शकतो असं विशालला वाटतं.’ कुटुंबाच्या आरोग्याचा विचार करून त्याने हा निर्णय घेतल्याचे यातून स्पष्ट होते.
महत्त्वाच्या बातम्या
- जेठालाल आणि टप्पू यांच्या वादाबाबत सुरू असलेलल्या चर्चांवर राजने दिली प्रतिक्रिया
- डब्लुटीसीच्या फायनलसाठी कोहलीच्या प्रशिक्षकांची ‘या’ संघाला पसंती
- पुन्हा अशीच गर्दी होत राहिल्यास निर्बंध अधिक कठोर केले जातील; मुख्यमंत्र्यांचा इशारा
- अभिनेता जॅकी भगनानी याच्यासह इतर आठ जणांनी लैंगिक छळ केल्याचा मॉडेलने केला आरोप
- ‘पुढची 100 वर्षे तुमची सत्ता येणार नाही, हे पवारांनी फडणवीस यांना सांगितले असेल’


