🕒 1 min read
मुंबई : कोरोनानंतर पहिल्यांदाच भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात येणार आहे. इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. हे दोन्ही सामन्यांचे आयोजन चेन्नईमध्ये करण्यात आले आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यात ४ कसोटी, ५ टी२० आणि ३ वनडे सामने खेळणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यामधील कसोटी मालिकेचा चेन्नईमध्ये श्रीगणेशा होणार आहे. पण पहिल्या दोन कसोटींसाठी स्टेडियममध्ये क्रिकेटप्रेमींना परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, अहमदाबाद येथील दोन कसोटी, पाच टी-20 आणि पुण्यातील तीन वन डे लढतींसाठी क्रिकेटप्रेमींना प्रवेश देण्याची तयारी बीसीसीआय करीत आहे.
अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या स्टेडियमची प्रेक्षक मर्यादा एक लाखांच्यावर आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्टेडियमच्या 50 टक्के किंवा त्यापेक्षा कमी व्यक्तींना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यासाठी बीसीसीआय प्रयत्न करीत आहे. मोटेरा स्टेडियममध्ये 25 ते 30 हजार क्रिकेटप्रेमींना परवानगी देण्यासाठी बीसीसीआयकडून पुढाकार घेण्यात येत आहे.
इंग्लंडचे क्रिकेटपटू भारत दौऱ्यासाठी चेन्नईत दाखल झाले आहेत. चेन्नईत या संघातील खेळाडूंची कोरोना चाचणी घेण्यात आली. या सर्व खेळाडूंची ही चाचणी निगेटिव्ह आली आहे. तसेच संघाच्या निवड समितीचे प्रमुख चेतन शर्माही चेन्नईत दाखल झाले आहेत. त्यांनाही आता बायोबबलमध्ये रहावे लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘ती’ आक्षेपार्ह पोस्ट शेअर करायला नको होती’
- ‘मुक्कद्दर’ चा सिकंदर स्वप्निल कोलते काळाच्या पडद्याआड !
- ‘दलित महिलांवर अत्याचार झाल्यावर चाकणकर लाली लिपस्टीक लावलेले तोंड घेऊन कुठे लपतात ?’
- १५ वर्षांपेक्षा जुनी वाहने जाणार थेट भंगारात; प्रदूषण रोखण्यासाठी नितीन गडकरींचं महत्वाचं पाऊल
- मुंबईला नाईट लाईफची गरज, त्यासाठी सुरक्षा पुरवू : अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

