नवी दिल्ली : रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा आयपीएल २०२२ हंगामात कोण कर्णधार होणार यावरून सध्या खूप चर्चा रंगल्या आहेत. स्पर्धा जवळ आली असतानाही अजून कर्णधाराचे नाव घोषित करण्यात आले नाही. त्यावर आरसीबीचा माजी कर्णधार डेनियल विट्टोरी म्हणाला की विराट कोहली पुन्हा आरसीबीचा कर्णधार होणार नाही.
ईएस क्रिकइन्फोशी बोलताना विटोरी म्हणाला की, “विराट पुन्हा संघाचा कर्णधार होणार नाही. कारण त्याने आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय संघाचे कर्णधारपद सोडले आहे. त्यामुळे तो पुन्हा कर्णधार पद घेणार नाही.
मला वाटते की, ग्लेन मॅक्सवेल, डू प्लेसी आणि दिनेश कार्तिक यांना कर्णधारपदाच्या शर्यतीत तुम्ही पहाचाल. मला वाटते की मॅक्सवेल जास्त काळासाठी संघाकडे एक चांगला पर्याय असेल. आयपीएलच्या तीन हंगामासाठी तो एक चांगले पर्याय असेल. ते त्याला तीन वर्षांचा विचार करून नियुक्त करतील. आशा आहे की तो मागील हंगामासारखाच खेळेल.”
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
