नवी दिल्ली : भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) अजूनही बीसीसीआयवर नाराज असल्याचे दिसत आहे. बोर्डाने त्याला गेल्या आठवड्यातच वनडेच्या कर्णधारपदावरून हटवले. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी टीम इंडियाच्या स्टार्सना रविवारी मुंबईत जमण्यास सांगण्यात आले होते, परंतु कसोटी कर्णधार सराव सत्राला उपस्थित राहिला नाही.
दक्षिण आफ्रिकेला जाणारे सर्व खेळाडू एक दिवसाच्या सरावासाठी मुंबईत पोहोचले होते. त्यावेळी कोहली मात्र सरावासाठी हजर नव्हता. खेळाडूंना 16 डिसेंबरला जोहान्सबर्गला जाण्यापूर्वी सोमवारपासून तीन दिवसांसाठी क्वारंटाइनमध्ये रहावे लागणार आहे.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, ‘विराटला स्पष्टपणे माहिती देण्यात आली होती. मात्र तो शिबिरात सहभागी झाला नाही. आम्हाला आशा आहे की तो उद्या सामील होईल आणि खेळाडू जोहान्सबर्गला जाण्यापूर्वी तीन दिवसांच्या बायो-बबलमध्ये प्रवेश करतील.’
निवडकर्ते आणि बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांनी विराट कोहलीला कॉल करण्याचा प्रयत्न केला पण विराट कोहली त्यांचा कॉल उचलला नाही. यापूर्वी त्याचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी कोहलीचा फोन बंद असल्याचे सांगितले होते.
कोहली आपल्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत आहे का, असे विचारले असता, बोर्डाच्या अधिकाऱ्याने ते फेटाळून लावले. ते म्हणाले की कोहलीही मुंबईत राहत असल्याने त्यात सहभागी होणार आहे. पुढे अधिकाऱ्याने सांगितले, ‘एखादा खेळाडू आमच्या कॉलकडे दुर्लक्ष का करेल? तो एक व्यावसायिक क्रिकेटपटू आहे आणि लवकरच संघासोबत असेल. पण अर्थातच त्याने परत कॉल करायला हवा होता.’ अस म्हणत अधिकाऱ्यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे.
????️????️ "The pressure will always be there. As a cricketer, it is important to focus on my job."
SPECIAL – @ImRo45's first interview after being named #TeamIndia’s white-ball captain coming up on https://t.co/Z3MPyesSeZ. ????️
Stay tuned for this feature ⌛ pic.twitter.com/CPB0ITOBrv
— BCCI (@BCCI) December 12, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…ही संकटाची चाहूल तर नाही ना , याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावेच लागेल’
- भाजप कार्यकर्त्यांविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून; राऊतांविरोधात दिल्लीत तक्रार दाखल
- सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपाला सांगितला राऊतांनी उच्चारलेल्या ‘त्या’ शब्दाचा अर्थ
- ‘मलिकांचे गुडगोईंग म्हणून कौतुक करणारे मुख्यमंत्री आव्हाड आणि टोपेंबाबत पक्षपात करत आहेत का?’
- दिल्लीत तक्रार दाखल झाल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले,’मी जो शब्द वापरला आहे त्याचा अर्थ…’

