Share

समुद्रासारखा शांत..! विराट कोहलीचा ‘शर्टलेस’ PHOTO सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ; पाहा!

Published On: 

मुंबई : विराट कोहली सध्या क्रिकेटमधून ब्रेकवर असून बीचवर सुट्टीचा आनंद घेत आहे. विराटने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो समुद्रकिनारी बसलेला दिसत आहे. भारताच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी विराटला विश्रांती देण्यात आली. विराटचा हा फोटो भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी व्हायरल झाला.

आयपीएल २०२२मध्ये खराब फॉर्ममधून जात असलेल्या विराट कोहलीला दिग्गजांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. धावा काढण्यासाठी तो खूप संघर्ष करत होता. विराट कोहली बर्‍याच काळापासून क्रिकेट खेळत आहे आणि या ब्रेकमुळे त्याला नव्याने पुनरागमन करण्यास मदत होईल, असा विश्वास संघ व्यवस्थापनाला आहे. कोहलीशिवाय रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहलाही विश्रांती देण्यात आली आहे.

कोहली धावा करत आहे, पण त्याला सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करता आलेले नाही. नोव्हेंबर २०१९ पासून कोहलीला शतकही करता आलेले नाही. आयपीएल २०२२ मध्ये त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी १६ सामन्यात ३४१ धावा केल्या. मात्र, यादरम्यान तोही तीनवेळा खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!