Share

Virat Kohli : विराट कोहलीच्या भन्नाट स्टाईलने जिंकली चाहत्यांची मने; पाहा ‘हा’ VIDEO!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विराट कोहलीच्या फिटनेसवर क्रिकेटचे अनेक चाहते प्रेम करतात. विराटही त्यांच्या फिटनेसचे व्हिडिओ वेळोवेळी चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करत असतो. आता कोहलीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून चाहत्यांसाठी असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो पंजाबी गाण्याच्या तालावर कसरत करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत किंग कोहलीने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘बर्‍याच दिवसांपासून हे प्रलंबित होते, पण मला वाटते की अजून उशीर झालेला नाही.’

विराट कोहली नुकताच भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. येथे त्याची बॅट पुन्हा एकदा त्याच्यावर नाराज असल्याचे पाहायला मिळाले. कोहलीची सातत्याने घसरत चाललेली कामगिरी पाहता अनेक दिग्गज त्याच्यावर कठोर प्रश्न उपस्थित करत आहेत. मात्र, सध्याचा संघाचा कर्णधार रोहित शर्मा माजी क्रिकेटपटूंच्या मताकडे लक्ष देत नाही. तो म्हणतो की कोहली हा आमच्या रणनीतीचा महत्त्वाचा भाग आहे. अशा परिस्थितीत संघ त्यांच्या पाठीशी उभा राहील.

भारतीय संघ पुढील दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजला पोहचला आहे. येथे भारताला यजमान संघासोबत ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. आगामी दौऱ्यासाठी निवड समितीने कोहलीला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. कोहलीने वेस्ट इंडीज दौऱ्यातून माघार घेतल्यानंतर ऑगस्टच्या अखेरीस सुरू होणाऱ्या आशिया चषकाच्या माध्यमातून तो क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळेल.

https://www.instagram.com/reel/CgMssvGgWHf/?igshid=YmMyMTA2M2Y=

मागील ३ वर्षांत एकही शतक नाही

विराट कोहलीला शेवटचे शतक ठोकल्यापासून ३ वर्ष उलटले आहे. कोहलीच्या बॅटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचे शतक नोव्हेंबर २०१९ मध्ये झळकले होते. त्यावेळी त्याने ईडन गार्डन्सच्या ऐतिहासिक मैदानावर १३६ धावांची खेळी करत शानदार शतक झळकावले होते. या शतकापासून कोहलीने ६८ सामन्यांच्या ७९ डावांमध्ये हजेरी लावली आहे. यादरम्यान त्याच्या बॅटमधून २५५४ धावांसह २४ अर्धशतकं झळकावली आहेत. मात्र त्याला एकही शतक झळकावता आलेलं नाही. यादरम्यान विराटची फलंदाजांची सरासरीही कमी झाली आहे. जिथे तो त्याच्या कारकिर्दीत ५३.६४ च्या सरासरीने धावा करत होता. त्याच वेळी गेल्या काही वर्षांत त्याची सरासरी ३५.४७ वर आली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!