Share

OBC reservation : बांठिया आयोगाच्या अहवालानुसार निवडणुका घ्या- सुप्रीम कोर्ट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यातील ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण देण्याचा फैसला सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. ओबीसी आरक्षणावर सुनावणी सुरू झाली असून निवडणूक आयोगाने लवकरात लवकर निवडणुका घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तसेच ३३७ ठिकाणी निवडणुका घ्या, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

दरम्यान उर्वरित निवडणुकांचा कार्यक्रम दोन आठवड्यांत जाहीर  करा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. मुख्य याचिकाकर्ते  विकास गवळी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही सातत्याने लढत असलेल्या लढाईला आज यश प्राप्त झाले आहे. हे संपूर्ण यश राज्याच्या ओबीसी प्रवर्गाचे आहे. यापुढील लढाई ही ओबीसींनाही आरक्षणात बजेट मिळावे यासाठी  असणार आहे.”, असे विकास गवळी यांनी म्हटले आहे.

तर बांठिया आयोगाच्या अहवालानुसार निवडणुका घ्या, असे आदेश सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. ओबीसी आरक्षणाबाबतीत कोर्टाचा हा सर्वांत मोठा निर्णय आहे. दरम्यान माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया आयोगाने केलेल्या सर्वेक्षणानुसार ओबीसींच्या लोकसंख्येबाबत आक्षेप घेण्यात आला होता. आज कोर्टाने याच सर्वेक्षणानुसार निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!