🕒 1 min read
मुंबई: राज्यातील ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण देण्याचा फैसला सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. ओबीसी आरक्षणावर सुनावणी सुरू झाली असून निवडणूक आयोगाने लवकरात लवकर निवडणुका घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तसेच ३३७ ठिकाणी निवडणुका घ्या, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या निर्णयानंतर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे आणि अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
“गेल्या अडीच वर्षांत फक्त उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यामुळे ओबीसींना न्याय मिळाला नाही. आज राज्यातील फडणवीस आणि शिंदे सरकारमुळे ओबीसींना आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाकरे सरकार असते तर त्यांनी बांठिया आयोगाचा अहवाल लवकर टेबल नसता केला. तो दाबून ठेवला असता. फडणवीस सरकारने हा रिपोर्ट स्वीकारला. म्हणून आरक्षण मिळाले.”, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरेंच्या मंत्रीमंडळातच झारीचे शुक्राचार होते. त्यांनीच ओबीसी आरक्षण थांबवले होते. कारण १३ डिसेंबर २०१९ साली जेव्हा पहिला रिपोर्ट आला, तेव्हाच ओबीसींना आरक्षण मिळाले असते. मात्र मविआ सरकारने असे केले नाही. असा टोलाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
दरम्यान उर्वरित निवडणुकांचा कार्यक्रम दोन आठवड्यांत जाहीर करा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तसेच बांठिया आयोगाच्या अहवालानुसार निवडणुका घ्या, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. ओबीसी आरक्षणाबाबतीत कोर्टाचा हा सर्वांत मोठा निर्णय आहे. दरम्यान माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया आयोगाने केलेल्या सर्वेक्षणानुसार ओबीसींच्या लोकसंख्येबाबत आक्षेप घेण्यात आला होता. आज कोर्टाने याच सर्वेक्षणानुसार निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- CWG 2022 : कॉमनवेल्थ गेम्स २०२२ पूर्वी भारताला मोठा धक्का, खेळाडू डोप चाचणीत फेल!
- OBC reservation : बांठिया आयोगाच्या अहवालानुसार निवडणुका घ्या- सुप्रीम कोर्ट
- iPhone 13 Offer : बजेट LOW पण डिमांड iPhone ची?; आता तुम्हालाही होईल शक्य कारण…
- Shiv Sena | “आम्हाला अनेक गोष्टी…” ; सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर शिवसेनेची प्रतिक्रिया!
- Jayant Patil : उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात; जयंत पाटलांचं मोठं विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
