🕒 1 min read
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारताने कसोटी मालिका गमावली आहे. त्यासोबतच तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतही आफ्रिकेने भारताला ३-० ने पराभूत करत व्हाईट वॉश केले आहे. एकदिवसीय मालिकेत भारताला एकही सामना जिंकता आला नाही. विराट कोहलीला ऐन मालिका सुरू व्हायच्या आधी बीसीसीआयने कर्णधारपदावरून बरखास्त केले होते. दरम्यान, कोहली आफ्रिकेविरुद्ध त्याचे ७१ वे शतक केव्हा करेल याकडे चाहत्यांचे लक्ष होते, मात्र रविवारी झालेल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) एका वेगळ्याच कारणाने चर्चेचा विषय बनला आहे.
कोणताही सामना सुरु होण्याआधी दोन्ही संघाचे राष्ट्रगीत सादर केले जाते. शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या राष्ट्रगीतादरम्यान माजी कर्णधार विराट कोहली च्युइंगम खाताना आढळला. बाकी खेळाडू राष्ट्रगीत गात असताना विराट मात्र च्युइंगम खात होता, या कृत्याचे अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. माजी कर्णधार असलेल्या विराटकडून असे कृत्य अपेक्षित नसल्याने चाहते त्याच्यावर भडकले आहे. त्याला मोठ्या प्रमाणावर टीकेचा सामना करावा लागत आहे.
Virat Kohli busy chewing something while National Anthem is playing. Ambassador of the nation.@BCCI pic.twitter.com/FiOA9roEkv
— Vaayumaindan (@bystanderever) January 23, 2022
https://twitter.com/Hitmanlegend45/status/1485240657211887618?s=20
राष्ट्रगीत सुरु असताना विराट कोहलीने च्युइंगम खाण्याची हि पहिली वेळ नाही. २०१७ मध्ये श्रीलंकेच्या भारत दौऱ्यात पहिल्या कसोटी सामन्यातही त्याने असे केले होते. तेव्हाही त्याला भरपूर टीकेचा सामना करावा लागला होता. मात्र तेव्हा त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीने राष्ट्रगीताचा असा अवमान करणे कोणालाही आवडलेले नाही. विराट कोहलीची ग्रहदशा अगदी मागील वर्षांपासून बदलेली दिसत आहे. एकामागून एक कोणत्याही कारणाने विराट सतत वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. कर्णधारपदावरून आधीच पायउतार झालेल्या विराटला आता बीसीसीआय या कृत्यामुळे अजूनच वेठीस धरू शकते असे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- गेल्या २४ तासांत देशातील ३ लाख ६ हजार नागरिक कोरोना पॉझिटीव्ह
- “देशात एकच मोदी नाहीत, निरव मोदी, ललित मोदीही आहेत, ‘त्या’ घटनेवरून नाना पटोले संतापले
- राज्य सरकार बरखास्त करण्यापेक्षा केंद्रातील सरकार बरखास्त करा-नाना पटोले
- “मविआ सरकारच्या राज्यात प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो”, भातखळकरांचे टीकास्त्र
- पाल्यांना शाळेत पाठवणे जोखमीचे वाटत असेल तर पाठवू नये- आदित्य ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
