Share

मोठी बातमी : आठ तासाच्या चौकशीनंतर मंत्री नवाब मलिक यांना ई़डीकडून अटक!

Published On: 

मुंबई : नवाब मलिक यांची ८ तास चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली आहे. ईडी कार्यालयाबाहेर मोठ्याप्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जमलेले आहेत. या पार्श्वभूमीवर कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी पोलीस दलासोबतच आता ईडी कार्यालयाबाहेर सीआरीपीएफची तुकडी देखील दाखल झालेली आहे. नवाब मलिकांना जेजे रुग्णालयाकडे नेण्यात आले आहे.

मलिकांच्या घरी ईडीचे अधिकारी आज पहाटेच धडकले होते. त्यांनी मलिकांना आपल्या कार्यालयात नेत सकाळी पावणेआठच्या सुमारास चौकशी सुरू केली होती. दरम्यान ईडीने त्यांना अटक केली आहे.

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकर याला विशेष न्यायालयाने शुक्रवारी २४ फेब्रुवारीपर्यंत ईडी कोठडी सुनावलेली आहे. त्यानंतर आता ईडीच्या रडारवर नवाब मलिक आले आहेत. इकबाल कासकरनं नाव घेतल्यानंतर मलिक यांची चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!