🕒 1 min read
चेन्नई : आयपीएल 14 व्या पर्वातील 16 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) राजस्थान रॉयल्सला (आरआर) 10 गडी राखून पराभूत केले. आरसीबीच्या विजयात कर्णधार विराट कोहलीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विराटने नाबाद 72 धावा केल्या. आयपीएलच्या या मोसमातील विराट कोहलीचे हे पहिले अर्धशतक होते.
विराटने आपला फिफ्टी पूर्ण केल्यानंतर लेक वामिकाला फ्लाइंग किस दिली. पण डगआऊटमध्ये बसलेला त्याचा सहकारी खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला वाटले की हे आपल्यासाठी आहे. त्यानंतर विराटने लक्ष वेधले की ही फ्लाइंग किसवामिकासाठी आहे, त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल हसत दिसला. विराट कोहलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हे अर्धशतक त्याने आपली मुलगी वामिकाला अर्पण केले. सामना पाहणार्या अनुष्कानेही टाळ्या वाजवून विराटचे स्वागत केले.
https://twitter.com/kingKOHLI1807/status/1385293914169434114?s=20
आरसीबीच्या व्यवस्थापनाने खेळाडूंना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह राहण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे अनुष्का शर्मा आणि तिची मुलगी कोहलीबरोबर प्रवास करत आहेत. गेल्या वर्षी अनुष्का आयपीएलसाठी संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) देखील गेली होती. यावर्षी जानेवारीत अनुष्काने एका मुलीला जन्म दिला. विराट कोहलीने सोशल मीडियावर मुलगी आल्याचा आनंद व्यक्त केला. पितृत्वाच्या रजेवर कोहली ऑस्ट्रेलिया दौर्यावरुन लवकर घरी परतला.
महत्वाच्या बातम्या
- कोरोना परिस्थितीवर पंतप्रधान मोदींची आज उच्चस्तरीय बैठक
- धक्कादायक बातमी : विरारमध्ये कोव्हिड रुग्णालयाला मध्यरात्री भीषण आग, १३ रुग्णांचा मृत्यू
- ‘हवं तर मी तुमच्या पाया पडतो पण महाराष्ट्राला रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन द्या!’
- बंगाल दिल्लीतील दोन गुंडांच्या हाती देणार नाही; ममता बॅनर्जींचा घणाघात
- विरारची घटना दुर्दैवी, आरोग्यमंत्री टोपेंनी राजीनामा द्यावा : किरीट सोमय्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
