मुंबई : दोन दिवसांपूर्वीची नाशिकची ऑक्सिजन टाकी लीक झाल्याने २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता वसईच्या कोविड हॉस्पिटलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली आहे. हॉस्पिटलला लागलेल्या आगीत १२ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अशी प्राथमिक माहिती सध्या मिळत आहे. पालघर जिल्ह्यातील वसईच्या कोविड सेंटरमध्ये ही आग लागली आहे. एसीचा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. या आगीत १२ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे, असे वसई विरार महापालिकेच्या कोरोना कंट्रोल रुमकडून सांगण्यात आले आहे.
विरार पश्चिमेकडे विजय वल्लभ नावाचे कोव्हिड रुग्णालय आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आज मध्यरात्री ३ ते ३.३० च्या दरम्यान भीषण आग लागली. यावेळी आयसीयू वॉर्डमध्ये जवळपास १७ रुग्ण उपचार घेत होते. यातील १३ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
यावर आता भाजपच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणामुळे राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरल आहे. ‘महाराष्ट्रात कोरोना आगीमुळे, ऑक्सिजनमुळे कोरोना मृत्यूचे तांडव सुरु आहे. विरारमधील आगीमध्ये १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला हि खूप दुर्दैवी बाब आहे. आता ठाकरे सरकारने अशा परिस्थिती केंद्र सरकारची, आर्मीची मदत घेतली पाहिजे. तसेच प्रत्येक कोविड रुग्णालयाच फायर आणि ऑक्सिजन ऑडीट झाल पाहिजे. आणि या सर्व घटनांची जबादारी स्वीकारून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा दिला पाहिजे.’ अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.
दरम्यान, अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असून पोलिसांकडून याठिकाणी मदतकार्य करण्यात आले. शिवाय रुग्णांना इतर ठिकाणी हलविण्यासाठीही युद्धपातळीवर हालचाली करण्यात येत असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
- धक्कादायक बातमी : विरारमध्ये कोव्हिड रुग्णालयाला मध्यरात्री भीषण आग, १३ रुग्णांचा मृत्यू
- ‘हवं तर मी तुमच्या पाया पडतो पण महाराष्ट्राला रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन द्या!’
- बंगाल दिल्लीतील दोन गुंडांच्या हाती देणार नाही; ममता बॅनर्जींचा घणाघात
- गुरुवारी विनाकारण फिरणाऱ्या २०४ जणांची कोरोना चाचणी ! ३ पॉझिटिव्ह
- RCBvsRR : टॉसवेळी विराट कोहली गडबडला, वाचा नक्की काय घडलं ?


