कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांचे वेध लागल्या पासूनच देशातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्ष विरुद्ध ममता बॅनर्जी अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. भाजप आणि तृणमूल यांच्यात जोरदार घमासान सुरु आहे. निवडणुकीत चांगलाच रंग चढला आहे. भाजपने बंगाल जिंकण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे तर दुसऱ्या बाजूला तृणमूल कॉंग्रेसचे नेते विजय आम्हीच मिळवू असं छातीठोकपणे सांगत आहेत.
वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या शाब्दिक हल्ल्यावर तृणमूल काँग्रेस नेत्या, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी जोरदार पलटवार केला. मी खेळाडू नाही. पण खेळ कसा खेळतात हे मला चांगलेच ठाऊक आहे. याआधी मी लोकसभेत सर्वात चांगली खेळाडू होती. त्यामुळे आमचा बंगाल दिल्लीतील दोन गुंडांच्या हातात कदापि देणार नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
दक्षिण दिनाजपूर येथील प्रचारसभेत बोलताना ममता बॅनर्जींनी मोदी, शहांवर हल्लाबोल चढवला. आम्ही गुजरातला आमच्या राज्यावर कब्जा करायला आणि दिल्लीतून सरकार चालवायला अजिबात देणार नाही. बंगालवर बंगालचेच राज्य असेल. भाजपचे नेते आपल्या प्रचारसभांमधून बंगालमध्ये डबल इंजिनचे सरकार बनवण्याच्या हेतूने राज्यातील जनतेला आवाहन करीत आहेत. याचा अर्थ असा की केंद्र आणि राज्यांमध्ये एकाच पक्षाचे सरकार असावे, असा भाजपचा मनसुबा आहे. हा मनसुबा आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. आमचे बंगाल दिल्लीतील दोन गुंडांच्या हाती सोपवणार नाही, असा इशारा ममता बॅनर्जींनी भाजपला दिला.
पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ पैकी सहाव्या टप्प्यातील मतदान काल (२२ एप्रिल) झालेलं आहे. सहाव्या टप्प्यात चार जिल्ह्यांतील ४३ विधानसभा मतदारसंघांत मतदान झालेले आहे. पश्चिम बंगालच्या पाचही टप्प्यातील मतदाना दरम्यान हिंसक घटना घडल्या होत्या. त्यामुळे निवडणूक आयोगानं सहाव्या टप्प्यासाठी केंद्रीय सुरक्षा दलाच्या १०७१ तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. जसजसे मतदानाचे टप्पे पुढे जात आहेत तसा इथला प्रचार चांगलाच रंगात आला आहे. राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
महत्वाच्या बातम्या
- धक्कादायक बातमी : विरारमध्ये कोव्हिड रुग्णालयाला मध्यरात्री भीषण आग, १३ रुग्णांचा मृत्यू
- ‘हवं तर मी तुमच्या पाया पडतो पण महाराष्ट्राला रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन द्या!’
- जीप व कारच्या अपघातात तिघे जखमी
- गुरुवारी विनाकारण फिरणाऱ्या २०४ जणांची कोरोना चाचणी ! ३ पॉझिटिव्ह
- RCBvsRR : टॉसवेळी विराट कोहली गडबडला, वाचा नक्की काय घडलं ?


